Homeटॉप स्टोरीआम्ही आईपुढेही माथा...

आम्ही आईपुढेही माथा झुकवत नाही!

आमचा धर्म आम्हाला कोणासमोरही झुकण्यास मान्यता देत नाही. आम्ही आमच्या आईपुढेदेखील माथा झुकवत नाही. त्यामुळे आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी ठाम भूमिका समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांनी आज विधानसभेत मांडल्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेवर अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आफताब पूनावला याने एक मोठे कांड केले. एका मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. यातून संपूर्ण देशात मुसलमान विरोधात वातावरण पेटले. महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांत सकल हिंदू आक्रोश रॅली काढण्यात आल्या. याद्वारे मुस्लिमांना इतके अपमानित केले गेले की जसे काही या देशात मुसलमान सगळ्यात मोठे देशद्रोही आहेत. जेव्हाजेव्हा देशात रक्ताची गरज भासली, तेव्हातेव्हा मुसलमान सगळ्यात आधी पुढे आला आहे. आता आम्हाला सांगितले जाते की हा देश तुमचा नाही, असे आझमी म्हणाले.

औरंगाबाद येथील २९ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता राम मंदिराजवळ तीन युवक मोटारसायकलवर आले. त्यांनी तिथे घोषणा दिल्या. त्या युवकांनी घोषणा दिल्या की तुम्हाला वंदे मातरम् म्हणावे लागेल. मी वंदे मातरम् म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो. आझमी यांच्या या वक्तव्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

अध्यक्षांनी अबू आझमी यांना लक्षवेधी सूचनेतील मुद्द्याच्या पलीकडे न बोलण्याचे निर्देश दिले. तरी आझमी बोलतच होते- त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी दोन्ही समूहातील युवकांना पांगवले. मात्र, संध्याकाळी पुन्हा सुमारे वीस युवक आले आणि पुन्हा घोषणा दिल्या की या देशात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम् म्हणावे लागेल. आझमी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण सभागृहात गदारोळ सुरू राहिल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content