Homeचिट चॅटक्रिप्टो खरेदीसाठी वझीरएक्सचे...

क्रिप्टो खरेदीसाठी वझीरएक्सचे ‘क्विकबाय’ लाँच!

भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने क्रिप्टो खरेदी करण्याचा अखंड अनुभव प्रदान करण्यासाठी ‘क्विकबाय’ ही नवीन सुविधा लाँच केली आहे. भारतात प्रत्येकाला क्रिप्टो उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेअंतर्गत नव्या क्रिप्टो गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार वन-टॅप क्रिप्टो व्यवहारांसाठी ही नवी सुविधा उपलब्ध असेल.

सुरक्षित क्रिप्टो ट्रेडिंग प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच भारतीय लोकांना फिनटेकच्या या नव्या पैलूची ओळख करून देण्याचा उद्देश यामागे आहे. क्विकबायसारखे फीचर ही काळाची गरज असून याद्वारे क्रिप्टोचा स्वीकार आणि लोकांमधील दरी सांधली जाईल. भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजचे यूझर्स १ दशलक्षांवरून २ दशलक्षांपर्यंत वाढले आहेत. ही आकडेवारी जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ यादरम्यानची आहे. एप्रिल २०२१मध्ये आणखी एक दशलक्ष यूझर्स वाढले. क्विकबायद्वारे वझीरएक्सचे या तिमाहित आणखी १० दशलक्ष यूझर्सची नोंदणी करण्याचा उद्देश आहे.

वझीरएक्सचे संस्थापक आणि सीईओ निश्चल शेट्‌टी म्हणाले की, वझीरएक्समध्ये ग्राहकांशी खरेपणाने वागणे आणि भारतात सर्वांसाठी क्रिप्टो उपलब्ध करून देणे, ही आमची प्राथमिकता आहे. वापरास सुलभ असे इंटरफेससह कमी विस्तारासह, रुपयातील सर्वोच्च तरलता ही बाजारात आधीपासूनच अतुलनीय आहे. हे घटक ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. क्विकबायसारखी सुविधा उपलब्ध करून आम्हाला ग्राहकांचा अनुभव आणखी वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे. याद्वारे भारतातील क्रिप्टो व्यवहार अधिक सुलभ होतील. त्यामुळे हजारो लोक यात सहभागी होतील.

कोव्हिडमुळे आलेला जॉब मार्केटमधील ट्रेंड मोडून काढण्यात यशस्वी ठरलेल्या मोजक्याच संस्थांमध्ये वझीरएक्सचा समावेश होते. येथील आकडेवारी वर्षअखेरीस तिपटीने वाढेल. या प्लॅटफॉर्मने नुकतेच मासिक ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये ३ दशलक्षांचा आकडा पार केला असून २.४ अब्ज डॉलर्सचा निधी जमवला आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content