Homeएनसर्कलउद्या ओटीटीवर बघा...

उद्या ओटीटीवर बघा ‘ओली की सुकी’!

प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित ‘ओली की सुकी’ हा चित्रपट उद्या, ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे प्रसिद्ध अभिनेते दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहोचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

“आयुष्यात अनेक अडचणी येतात पण आपण त्यांना सामोरे जाऊन यशाच्या दिशेने अविरत चालत राहायला हवं. अशा प्रेरणादायी आशयाचा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री वाटते”, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content