Homeकल्चर +बिग बॉसमधून विशाल,...

बिग बॉसमधून विशाल, स्नेहा आणि गायत्री होणार थेट बाहेर!

बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्यादरम्यान काल बरेच राडे बघायला मिळाले. बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनी नियमभंगही केले आणि याचमुळे बिग बॉसने सदस्यांची कडक शब्दांत केवळ कानउघाडणीच नाही केली तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणामदेखील भोगावे लागले.

कुठलेही कार्य पार पाडताना वेगवेगळया युक्त्या वापरणे योग्यच असते. पण, ते पार पाडत असताना धक्काबुक्की होणे, कुठल्याही सदस्याला शारीरिक इजा होणे अतिशय निंदनीय आहे. बिग बॉसने जय, उत्कर्ष, विकास आणि आदिशला सक्त ताकीद दिली. विशाल निकमने काल बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचे नुकसान केले आणि त्यामुळे या कृत्याचा बिग बॉसने तीव्र शब्दात निषेध केला. प्रॉपर्टीचे नुकसान ही अक्षम्य चूक असल्याने विशालला बिग बॉसने पुढील आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले.

ताकीद दिल्यानंतरही काही सदस्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आली. हे कार्य खिलाडूवृत्तीने खेळायचे होते. पण तसे झाले नाही. आक्रमकता आणि धक्काबुक्की कार्यामध्ये केली गेली. ही वागणूक लज्जास्पद असून बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. साप्ताहिक कार्य रद्द केले. गायत्री आणि स्नेहा रागावरचे नियंत्रण गमावून आक्रमक झाल्या. त्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होऊ शकत होती आणि बिग बॉसला हे अमान्य आहे. म्हणूनच त्या दोघींनाही पुढील आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले.

आज बिग बॉसच्या घरात स्नेहा आणि जयची मस्ती बघायला मिळणार आहे. त्यांच्यामधील मैत्रीची चर्चा तर सगळीकडेच आहे. बघूया आज काय होणार ते? आज, घरामध्ये कॅप्टन कोण बनणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. कारण, कालच्या भागामध्ये दाखविल्याप्रामाणे आज एका कार्याद्वारे घरातला कॅप्टन कोण हे आपल्याला समजणार आहे.

हे सगळे राडे घडत असतानाच मीरा गायत्रीसमोर तिचं मन मोकळं करताना दिसणार आहे. काल समोर आलेल्या प्रोमोनुसार मीरा गायत्रीसोमर तिची खंत व्यक्त करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तिला अश्रू अनावर होतात आणि तिचा बांध तुटतो. मीरा गायत्रीसमोर ढसाढसा रडते. नक्की असं काय घडते? कोण मीराला दुखावतं? कोणाच्या वागण्याचे मीराला इतके वाईट वाटले असावे?

मीरा गायत्रीला म्हणते, “मला ऐकवायचे आहे… नाहीतर भांडायचे आहे… मला काहीतरी बोलायचे आहे.. नाहीतर.. नाही होणार माझ्याकडून. माझ्या मनामधून नाही निघणार… नाही सहन होत….”

बघूया नक्की काय घडतं ते.. आज रात्री बिग बॉसमध्ये.. कलर्स मराठीवर.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content