Homeटॉप स्टोरीविनोद तावडे, पंकजा...

विनोद तावडे, पंकजा मुंडे महाराष्ट्र भाजपातून ‘आऊट’!

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे पक्षाच्या राज्यातल्या राजकारणातून जवळजवळ बाद झाले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची वर्णी राष्ट्रीय कार्यकारिणीत लावतानाच त्यांच्यावर अनुक्रमे हरयाणा व मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तावडे हरयाणाचे प्रभारी आहेत तर पंकजा मुंडे यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आज नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली असून त्यातल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत महाराष्ट्रातून नितीन गडकरींसह पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांना यामध्ये स्थान मिळाले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आणि विनय सहस्त्रबुद्धे हे इतर तीन सदस्य आहेत. विनोद तावडे, सुनील देवधर आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि लड्डाराम नागवाणी यांना विशेष निमंत्रित म्हणून जागा देण्यात आली आहे. हिना गावित तसेच संजू वर्मा यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

जमाल सिद्दीकी यांची अल्पसंख्याक मोर्चात वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंह पावैया यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content