Homeपब्लिक फिगरउपराष्ट्रपती धनखड यांनी...

उपराष्ट्रपती धनखड यांनी केले एनसीसी प्रजासत्ताकदिन शिबिराचे उद्घाटन

युवकांच्या उर्जेला सकारात्मकतेचा मार्ग दाखवून युवा विकास आणि देशाच्या प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात केल्याबद्दल, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) काल प्रशंसा केली. एनसीसी कॅडेट्स हे भारताच्या उदयाचे महत्त्वाचे भागीदार असून, देशाच्या युवकांपुढील आदर्श आहेत, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली येथे एनसीसी प्रजासत्ताकदिन शिबिर-2024च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, धनखड यांनी कॅडेट्सची ऊर्जा चिरंतन आणि चिरस्थायी आहे, हे अधोरेखित करत आपल्या एनसीसी कॅडेट असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. कॅडेट्सनी आपल्या प्रतिष्ठेचा सर्वोत्तम दर्जा कायम  राखावा. भारताला  2047पर्यंत खऱ्या अर्थाने विकसित देश आणि विश्व गुरू करण्यासाठी उत्साह, शौर्य आणि समर्पित भावनेने काम करावे. शिस्त आणि देशभक्ती हे गुण तुमच्या हृदयात सदैव वसत राहायला हवेत, हीच आपल्या मातृभूमीला सर्वात मोठी आदरांजली  आहे, असे ते म्हणाले.

एनसीसी, राष्ट्रीय जागरूकता मोहिमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा नैसर्गिक विकास सुनिश्चित करते. एनसीसीमधील महिलांच्या वाढत्या सहभागाची प्रशंसा करत धनखड म्हणाले की, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी, महिला छात्र  दोन विशेष तुकड्यांमध्ये महिला बँड पथकांसह कर्तव्य पथावर अभिमानाने संचलन करतील.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content