Homeबॅक पेजव्हाईस ऍड. तरुण...

व्हाईस ऍड. तरुण सोबती नौदलाचे नवे उपप्रमुख!

व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी 1 ऑक्टोबरला भारताचे नवे नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती यांची 1 जुलै 88 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती करण्यात आली होती. ते नेव्हिगेशन आणि डायरेक्शन तज्ञ आहेत.

आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी समुद्र आणि तटीय अशा दोन्ही ठिकाणी विविध प्रकारच्या कमांड आणि स्टाफच्या नियुक्त्या केल्या आहेत. फ्लॅग ऑफिसर म्हणून त्यांनी आयएनएस निशंक, एक क्षेपणास्त्र जहाज, आयएनएस कोरा, एक क्षेपणास्त्र कॉर्व्हेट आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस कोलकाताचे नेतृत्व केले.

2019 मध्ये रिअर अॅडमिरल पदावर बढती मिळाल्यावर, त्यांची भारतीय नौदल अकादमी, एझिमाला येथे डेप्युटी कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2021 मध्ये व्हाईस अॅडमिरल पदावर बढती झाल्यावर, एनएचक्यू संरक्षण मंत्रालय येथे नौदल उपप्रमुख म्हणून सध्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी प्रकल्प सीबर्डचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लॅग ऑफिसरना 2020 मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि 2022 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. 30 सप्टेंबर 2023 रोजी 38 वर्षांहून अधिक गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले व्हाईस अॅडमिरल संजय महिंद्रू यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

Continue reading

ईक्षा देसाईंचे वयाच्या आठव्या वर्षींचे स्वप्न साकार! झाल्या ‘मिसेस इंडिया’!!

मुंबईतल्या अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मानसशास्त्रज्ञ ईक्षा देसाई यांनी वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट 'मिसेस इंडिया विजेती २०२६' म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह समाजात आनंदाची लाट उसळली आहे. यासोबतच...

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...
Skip to content