Homeपब्लिक फिगरलोणारच्या जागतिक हेरिटेजच्या...

लोणारच्या जागतिक हेरिटेजच्या महत्त्वानुसार विकासकामे करा!

बुलडाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून याठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखालील लोणार सरोवर विकास आराखडा समितीच्या माध्यमातून विकास आराखड्याच्या कामांची अंमलबजावणी सुरू आहे. पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या लोणार परिसरात जागतिक दर्जाच्या पर्यटन सोयीसुविधा द्याव्यात. लोणार विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यातील कामे जागतिक दर्जाची करावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात लोणार विकास आराखड्याबाबत बैठक झाली. बैठकीला सहकार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय रायमूलकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ. अरूण मलिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

लोणार विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणार सरोवराचे हेरिटेज महत्त्व लक्षात घेऊन या परिसरातील विकासकामे दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी. सरोवराजवळ वन्यजीव अभयारण्य आहे. याठिकाणी लावण्यात येणाऱ्या संरक्षण जाळ्या, प्रसाधनगृहे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासारख्या पायाभूत सुविधा या वारसास्थळाला शोभणाऱ्या, साजेशा असाव्यात. पशुपालक तारेच्या संरक्षण जाळ्या तोडून जनावरे घेऊन आत चरायला जाऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी. लोणार विकास आराखड्यासाठी संवर्धन वास्तुविशारद (कन्झर्व्हेटिव्ह आर्किटेक्चर) नियुक्त करावा. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाची मदत घ्यावी. याबाबत न्यायालयाला अवगत करावे असेही सांगितले.

सरोवराच्या संरक्षण भिंती हेरिटेज दर्जानुसार असल्या पाहिजेत. विभागीय आयुक्तांनी कामांच्या दर्जाबाबत दक्षता घ्यावी. राज्य शासन लोणार सरोवर विकास आराखड्यासाठी आवश्यक निधी देत आहे. मात्र, त्यातून होणारी कामे जागतिक दर्जाची असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने हेरिटेज कामांचा अनुभव असणाऱ्या सक्षम वास्तुविशारदास नेमून जागतिक दर्जाच्या कामांचा समावेश असणारा आराखडा एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

शासनाने ३६९ कोटींचा लोणार विकास आराखडा मंजूर केला असून त्यातील कामे २०२२ ते २०२७ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. या विकास आराखड्यामध्ये ७६ कामांचा समावेश असून त्यापैकी १७ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ३० कामे प्रगतीपथावर आहेत. तर अंदाजपत्रकीय स्तरावर २७ कामे आहेत. विकास आराखड्यातील कामांचा न्यायालयामार्फत नियमित आढावा घेण्यात येतो, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content