Homeटॉप स्टोरीउद्धवजी, स्वा. सावरकरांचे...

उद्धवजी, स्वा. सावरकरांचे नाव पुसू पाहणाऱ्यांना देणार समर्थन?

उद्धवजी, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव पुसायला निघाले आहेत. धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत… यावर आता तुमचे नेमके मत काय आहे, हेदेखील तुम्ही सांगितले पाहिजे. की सत्तेकरीता तुम्ही हाही समझोता केला का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

कर्नाटक सरकराने पाठ्यपुस्तकातून स्वा. सावरकरांवरील तसेच डॉ. हेडगेवार यांच्यावरील धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, एखादा धडा तुम्ही वगळू शकता. पण लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर काढू शकत नाही, तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वातंत्र्यसंग्राम सेनानीना लोकांच्या मनातून काढू शकत नाही. 

काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच अपेक्षित नाहीत. केवळ अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याकरीता, ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे, माझा महाविकास आघाडीला सवाल आहे. तुम्ही जे सांगता की, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?, असा सवालही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content