Homeबॅक पेजसेमीकॉन इंडिया परिषदेत...

सेमीकॉन इंडिया परिषदेत दोन स्टार्टअप्सची घोषणा

इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) गांधीनगर येथे आयोजित सेमीकॉन इंडिया 2023 परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सेमीकॉन इंडिया फ्युचर डिझाईन डीएलआय योजनेअंतर्गत आणखी दोन सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप / एमएसएमईची घोषणा केली.

डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) योजनेअंतर्गत पाठबळासाठी निवडलेले हे दोन स्टार्टअप/एमएसएमई आहेत:

  1. अहीसा डिजिटल इनोव्हेशन्स आणि
  2. कॅलिगो टेक्नॉलॉजीज

अहीसा डिजिटल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Aheesa Digital Innovations Private Limited) (Aheesa) ही चेन्नई येथील फॅबलेस सेमीकंडक्टर स्टार्ट-अप कंपनी आहे जी दूरसंचार, नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात कार्य करते.

कॅलिगो टेक्नॉलॉजीज (Calligo Technologies) ही भारतातल्या बेंगळुरू येथील फॅबलेस सेमीकंडक्टर स्टार्ट-अप कंपनी आहे जी एचपीसी, बिग डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (AI/ML) क्षेत्रात जागतिक कंपन्यांना सेवा देत आहे.

डीएलआय योजनेचे उद्दिष्ट म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीत सेमी कंडक्टरची रचना करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांसाठी जसे इंटिग्रेटेड सर्किट्स (ICs), चिपसेट, सिस्टम ऑन चिप्स (SoCs), सिस्टम आणि आयपी (IP) तसेच सेमीकंडक्टर लिंक्ड यांच्या विकासाच्या विविध टप्प्यांवर आर्थिक प्रोत्साहन देणे तसेच पायाभूत ढाचा प्रदान करणे हे आहे. या योजनेची अंमलबजावणी सी डॅकच्या (C-DAC) माध्यमातून केली जाते.

या घोषणेसह, डीएलआय (DLI) योजनेंतर्गत आता एकूण 7 स्टार्ट-अप ऑटोमोटिव्ह, मोबिलिटी आणि कॉम्प्यूटिंग क्षेत्रांसाठी चिप आणि आयपी (IP) कोर निर्मितीचे काम करतील.

डीएलआय (DLI) योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया https://chips-dli.gov.in/ इथे  भेट द्या. अहीसा आणि कॅलिगोबद्दल अधिक माहिती https://www.aheesa.com आणि https://calligotech.com इथे उपलब्ध आहे.

Continue reading

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...
Skip to content