Homeकल्चर +विठूनामाच्या गजरात दुमदुमली...

विठूनामाच्या गजरात दुमदुमली त्रिपुरानगरी!

टाळ-चिपळ्या, मृदुंग, ढोल, हार्मोनियम यांच्या सुरावटींवर विठूनामाच्या गजरात त्रिपुरा नगरी नुकतीच दुमदुमली. याचे निमित्त होते, तेथे शुक्रवारी सुरू झालेले अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन.

त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या छोट्या वारकऱ्यांची दिंडी लक्षवेधी ठरली. उज्जयंता पॅलेस ग्राऊंड ते रवींद्र शताब्दी भवन असे मार्गक्रमण करणाऱ्या या शोभायात्रेत विठूनामाच्या भक्तीरसात न्हाहलेल्या वारकऱ्यांनी गोल रिंगणही सादर केले. या शोभायात्रेला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

उद्घाटन कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी कृष्णगीतावर आधारित नृत्याविष्काराद्वारे जागर केला. पांढऱ्या पेहरावातील या अध्यात्मिक शांतीदूतांनी आपल्या कुशल सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन आणि इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या अष्टलक्ष्मी संत विचार संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ही शोभायात्रा काढण्यात आली होती. शांती काली आश्रमाचे महंत चित्त महाराज यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत मान्यवर साधु-संत, अभ्यासकांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

या शोभायात्रेत ईशान्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ‘भक्तीसंगम’ पाहायला मिळाला. ईशान्येकडील राज्यांमधील पारंपरिक नृत्यप्रकारांचाही यात समावेश होता.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content