Homeकल्चर +‘हिरा फेरी’चा ट्रेलर...

‘हिरा फेरी’चा ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा संपन्न!

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या ‘ढ लेकाचा’, ‘अदृश्य’, ‘बोल हरी बोल’ अशा सुपरहिट चित्रपटांनंतर आता “हिरा फेरी” हा नवा कोरा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानिमित्त “हिरा फेरी” या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि अल्ट्रा मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल, मार्केटिंग हेड ब्रिंदा अग्रवाल, बिजनेस हेड वेंकट गारापाटी, चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल बिडकर, कलाकार अभिनय सावंत, प्रवीण प्रभाकर तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक काशी रिचार्ड आणि गायक अरुण देव यादव, मनाली चतुर्वेदी, लव पोद्दार उपस्थित होते.

“हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर एकदम दिमाखदार असून चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावई विक्कीने, म्हणजेच निर्मिती सावंत यांचे सुपुत्र अभिनय सावंतने, आपली बायको अनुसोबत एका चोराला आपल्या जाळ्यात अडकवून, त्याचा बहुमोल हिरा हडपण्याच्या प्रयत्नांत असताना, तिथे बायकोचा बाप, चोराचा बॉस, मांत्रिक, पत्रकार आणि पोलिसांचा मिलाप होऊन त्या हिऱ्यासाठी घोडदौड सुरू होते आणि हिरा फेरीत हिरा कोणाकडे फिरेल हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. नेमका हिरा कोणाकडे जाईल याची धम्माल विनोदी मजा प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे.

यावेळी चित्रपटाचे निर्माते अग्रवाल म्हणाले की, प्रेक्षकांच्या वाढत्या दर्जेदार मनोरंजनाच्या मागणीचा मागोवा घेत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करत बक्कळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी आम्ही “हिरा फेरी” हा लोटपोट हसवणारा विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. तो सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच भावेल याची खात्री आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content