Homeकल्चर +'दाल रोटी'चा ट्रेलर...

‘दाल रोटी’चा ट्रेलर प्रदर्शित!

युवा वर्गाने शेती करून तिला एक व्यापक स्वरुप द्यावे तसेच त्यातून प्रगती साध्य करावी, निर्धार पक्का असेल तर सध्याच्या कृषी समस्यांचे आव्हान त्यांना सहजपणे पेलता येईल, याबाबत मनोरंजनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत देशभक्तीचा संदेश देणाऱ्या ‘दाल रोटी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आफ्ताब पिक्चर्सच्या बॅनरखाली सलीम अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी राज सिप्पी यांच्यासमवेत कयामत, लोहा, जे. पी. दत्ता यांच्यासमवेत बटवारा, अशोक गायकवाड यांच्यासमवेत दूध का कर्ज, इज्जत, फूल और अंगार, राजा की आयेगी बारात, फारूख सिद्दीकी, राज कंवर यांच्यासमवेत अनेक चित्रपट दिले आहेत. पहिल्यांदाच ते महिला दिग्दर्शक जुली जास्मिन यांच्यासमवेत हा चित्रपट करत आहेत.

शमा अख्तर या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. यात दिशांत गुलिया, रुपाली थापा, कौस्तुभ दबराल, प्रियांका देहलान, रेणू मल्होत्रा, रितू गुलाटी, अजय शर्मा, राकेश गिरी, अरुण नागी, आदित्य भारद्वाज, साहिल सिद्दीकी, अनमोल चौधरी असे कलाकार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या देशाबद्दलचे प्रेम अधिक जागरूक होणार आहे. यात राष्ट्रगीताचीही उत्तम निर्मिती केली गेली आहे. प्रेक्षकांसाठी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यातून या चित्रपटाच्या कथानकाची कल्पना येते.

ट्रेलरची लिंक- https://www.youtube.com/watch?v=j6vFtyRlkfk

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content