Homeब्लॅक अँड व्हाईटप्रवेश शुल्क आणि...

प्रवेश शुल्क आणि बँक हमीसाठी ‘ट्राय’कडून शिफारशी जारी!

‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने “प्रवेश शुल्क आणि बँक हमी यांची दर आकारणी तर्कसंगत योग्य असावी, या संदर्भात शिफारशी जारी केल्या आहेत. “प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगत आकारणी” याविषयी आलेल्या सर्व शिफारशींचा संपूर्ण मजकूर ‘ट्राय’ च्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दूरसंचार विभागाने  (डीओटी ), पत्र क्र. 20-577/2016-AS-I Vol.III नुसार 3 मार्च 2022 रोजी ट्रायला एक पत्र पाठवले होते. यानुसार दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध परवान्यांसाठी प्रवेश शुल्क आणि बँक हमी यांचे दर तर्कसंगत करण्यासाठी कळवले होते.

यानुसार ट्रायने दरविषयक विविध शिफारसी सूचवल्‍या आहेत. यामध्ये संभाव्य प्रवेशकर्त्यांनी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी एक निश्चित रक्कम, प्रवेश शुल्क म्हणून भरावी. हे प्रवेश शुल्क सामान्यत: परत केले जाणार नाही. अशा प्रकारचा खर्च हा त्या कंपनीसाठी ‘स्टार्ट-अप खर्च’ असतो. तसेच बँक हमी म्हणजे सरकारच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आर्थिक साधन आहे. परवानाधारकाने त्याची देय रक्कम वेळेवर भरली आहे आणि परवाना करारामध्ये नमूद केलेल्या अटी आणि नियमांनुसार त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे, हे त्यातून स्पष्‍ट होते.

ट्रायच्या वतीने दि. 26 जुलै 2022 रोजी “प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगतीकरण” या विषयावर झालेल्या विचारविनिमयाच्या आधारावर एक संदर्भ दस्तऐवज जारी केला आहे. त्यावर 23 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर 2022 पर्यंत हितधारकांकडून लिखित टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या मागविण्यात आल्या होत्या. उद्योग संघटनांच्या/ भागधारकांच्या विनंतीवरून, लेखी टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 6 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. प्राधिकरणाला विविध भागधारकांकडून 20 टिप्पण्या आणि 1 प्रति-टिप्पणी प्राप्त झाली. या सर्व टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आभासी माध्‍यमाद्वारे 9 डिसेंबर 2022 रोजी या दस्तऐवजामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ‘ओपन हाऊस’ चर्चा आयोजित करण्यात आली होती.

परवान्याच्या नूतनीकरणाच्या वेळी प्रवेश शुल्क न घेण्याची शिफारसही प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे विद्यमान तसेच नवीन प्रवेशकर्त्यांवरील आर्थिक भार कमी होण्‍यास मदत होईल आणि विशेषतः यूएल (व्हीएनओ) परवानाधारकांसाठी लाभदायक ठरणार आहे. “प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगत आकारणी” याविषयी आलेल्या सर्व शिफारशींचा संपूर्ण मजकूर ‘ट्राय’ च्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण हवे असेल /माहिती हवी असे तर, अमित शर्मा, सल्लागार (F&EA) यांच्याशी advfea2@trai.gov.in किंवा दूरध्वनी क्रमांक +91-11-23234367 वर संपर्क साधता येईल.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content