Homeबॅक पेजहजारो टन गहू...

हजारो टन गहू आणि तांदळाचा येत्या बुधवारी लिलाव!

भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने गहू आणि कच्च्या तांदळाचा लिलाव जाहीर केला आहे. येत्या 3 जानेवारी 2024 रोजी हा लिलाव होईल. या लिलावाअंतर्गत 17500 मेट्रिक टन गहू आणि 5000 मेट्रिक टन कच्च्या तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

खाद्यान्न प्रक्रिया उद्योजक / पीठ गिरण्या उद्योजक / गव्हापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे उद्योजक तसेच तांदळाचे व्यापारी / घाऊक खरेदीदार / उत्पादक या लिलावात सहभागी होऊ शकणार आहेत. या लिलावाकरता गव्हाच्या साठ्यासाठीची 13500 मेट्रिक टनाची मर्यादा वाढवून ती 17500 मेट्रिक टन केली गेली आहे. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्र विभागांतर्गतच्या एकूण 25 धान्यसाठा आगारांमधून गव्हाचा हा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर एकूण 9 धान्यसाठा आगारांमधून तांदळाचा 5000 मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

गहू

याअंतर्गत खाद्यान्न प्रक्रिया उद्योजकांना सर्व क्षेत्रांसाठी एकाच ई-लिलावात प्रत्येकी कमीतकमी 10 मेट्रिक टनासाठी बोली लावता येईल, तर सगळ्या बोली मिळून कमी दाबाची एकके (Units with LT Connection) चालवणाऱ्यांना 50 मेट्रिक टनापेक्षा जास्त, तर उच्च दाबाची एकके चालवणाऱ्यांना (Units with HT Connection) 250 मेट्रिक टनापेक्षा जास्त बोली लावता येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. वीज बिलावर जोडणीचा प्रकार नमूद नसेल तर 1 ते 75 किलोव्होल्ट-अँपिअर (KVA) पर्यंतच्या मंजुरीच्या भाराची जोडणी कमी दाबाचे एकक म्हणून ग्राह्य धरली जाईल. मात्र ही अट केवळ गव्हासाठी लागू असेल, तर तांदळासाठी प्रति निविदाकार बोलीची किमान मर्यादा 1 मेट्रिक टन आणि जास्तीत जास्त 2000 मेट्रिक टन असेल असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

गहू

भारतीय अन्न महामंडळाने (FCI) गहू आणि तांदळाचा साठा खरेदी करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांकरता, मान्यताप्राप्त खरेदीदारांची सूची तयार करायला सुरूवात केली आहे. यासाठी उत्सुक असलेले खरेदीदार भारतीय अन्न महामंडळाची ई लिलाव सेवा पुरवठादार असलेल्या ‘एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड’ (https://www.valuejunction.in/fci/) या कंपनीच्या संकेतस्थळावरून या यादीत स्वतःचा समावेश करून घेऊ शकतात आणि विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याकरता बोली लावू शकतात. अशा तऱ्हेने स्वतःची नोंदणी करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांची नोंदणी प्रक्रिया 72 तासांच्या पूर्ण केली जाते. भारतीय अन्न महामंडळाने (FCI) खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत [OMSS – Open Market Sale Scheme(D)] 2023 मध्ये जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून (28 जून 2023) गहू आणि तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याला सुरूवात केली होती.

खुल्या बाजारातील विक्री योजनेमुळे [OMSS – Open Market Sale Scheme (D)] अन्नधान्यांच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यास मदत होणार असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content