Homeकल्चर +गौरी पाठारेंना यंदाचा...

गौरी पाठारेंना यंदाचा गानसरस्वती पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२३ सालचा गानसरस्वती पुरस्कार ग्वाल्हेर-जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका गौरी पाठारे यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी हा पुरस्कार ५० वर्षांखालील शास्त्रीय कंठ संगीताच्या प्रथितयश कलाकारास दिला जातो.

स्व. पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी पद्मा तळवलकर, पं. अरुण द्रवीड यांच्य त्या शिष्या आहेत. गानसरस्वती पद्मविभूषण स्व. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे ज्येष्ठ शिष्य पं. अरुण द्रवीड यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला आहे. पुरस्काराविषयीची अधिक माहिती www.gspuraskar.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पुरस्कार वितरण दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रविवार, दि. १० मार्च २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता शानदार सोहळ्यात करण्यात येईल. यावेळी गौरी पाठारे यांचे गायनदेखील सादर होईल. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content