Homeन्यूज अँड व्ह्यूजसमान नागरी कायदा...

समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली..

समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल भर दिला.

आयआयटी गुवाहाटीच्या 25 व्या दीक्षांत समारंभाला आज उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ‘देशाच्या प्रशासनात मूलभूत आहेत’ आणि त्यांचे नियम बनवणे हे राज्याचे कर्तव्य आहे यावर त्यांनी भर दिला.

भारताची प्रतिमा डागाळण्याचा आणि “राष्ट्रविरोधी भूमिका बांधण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. याविरुद्ध सावधगिरी बाळगत अशा प्रवृत्तींना प्रभावीपणे नाकारण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.

कोणत्याही परदेशी घटकाला आपल्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेशी छेडछाड करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असे उपराष्ट्रपतींनी निदर्शनास आणून दिले. जागतिक शांतता आणि सौहार्दाला स्थैर्य देणारी सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वात कार्यशील आणि चैतन्यमय लोकशाही म्हणून भारताचे वर्णन करताना, आपण आपली समृद्ध आणि बहरणारी लोकशाही तसेच संवैधानिक संस्थांना धक्का लावू देऊ शकत नाही यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

भ्रष्टाचाराला आता थारा नसल्याचे नमूद करून त्यांनी भ्रष्टाचारमुक्त समाज घडवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी भारतीयत्वाचा आणि त्याच्या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगावा असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आर्थिक राष्ट्रवादासाठी वचनबद्ध राहावे आणि राष्ट्र तसेच राष्ट्रवादाची किंमत मोजून आर्थिक नफा मिळवण्यापासून परावृत्त व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याआधी उपराष्ट्रपतींनी (डॉ.) सुदेश धनखड  यांच्यासह  गुवाहाटी येथील प्रसिद्ध माता कामाख्या मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content