Homeएनसर्कलकोक्राझार येथे पहिल्यांदाच...

कोक्राझार येथे पहिल्यांदाच होतेय डुरांड चषक फुटबॉल स्पर्धा!

आसाममधील कोक्राझार येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 132व्या डुरांड चषक फुटबॉल स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन केले. या वार्षिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पहिल्यांदाच या ठिकाणी झाला. सशस्त्र दलांनी आसाम सरकारच्या सहकार्यांने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

सशस्त्र दले आणि बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल (बीटीसी) यांनी कोक्राझारमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केल्यामुळे या शहरात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करता आला याबद्दल राजनाथ सिंह यांनी त्यांची प्रशंसा केली. ईशान्येकडील लोकांना फुटबॉलबद्दलचा असलेला उत्साह आणि प्रेम याबद्दल त्यांनी कौतुक केले. हा ‘सुंदर खेळ’ हा केवळ एक क्रीडाप्रकार नसून ती एक भावना आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आसाममध्ये अलीकडच्या काळात अनेक प्रतिभावान फुटबॉलपटू तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.  डुरांड चषक युवकांना नव्या जोमाने फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

या प्रदेशातील समृद्ध क्रीडा संस्कृतीबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सविस्तर माहिती दिली आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. कोक्राझारमध्ये स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आणि त्यासाठी बीटीसीनं केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या उद्घाटन सोहळ्याला आसाम आणि ईशान्य भागातले सुमारे 12,000 फुटबॉल चाहते उपस्थित होते. सुखोई-30 एमकेआय विमान आणि एमआय-17 हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके, मार्शल डिस्प्ले, गटका आणि भांगडा नृत्यासह स्थानिक पथकाने सादर केलेले बोडो सांस्कृतिक नृत्य ही या समारंभाची प्रमुख आकर्षणे ठरली.

उद्घाटन समारंभानंतर बोडोलँड एफसी आणि राजस्थान युनायटेड एफसी यांच्यातील स्पर्धेचा सलामीचा सामना झाला. कोक्राझार येथे 24 ऑगस्ट 2023 रोजी आठ गट सामने आणि एक उपांत्यपूर्व फेरी खेळली जाणार आहे. एकूण 24 संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. त्यात नेपाळ आणि बांगलादेश हे दोन परदेशी संघ, भारतीय सशस्त्र दलाचे तिन्ही संघ आणि बोडोलँड एफसीचा स्थानिक संघ यांचा समावेश आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि कोक्राझार या तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content