Homeपब्लिक फिगरसफाई कामगाराची सून...

सफाई कामगाराची सून ठरतेय दक्षिण मुंबईतली आकर्षण

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या उमेदवारीमुळे या परिसरातल्या सफाई कामगारांच्या वस्त्या तसेच सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आमदार यामिनी जाधव आहेत एका सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या सुन्षा (सूनबाई) आहेत.

शिवसेनेच्या आमदार आणि आता महायुतीच्या लोकसभा उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या सासुबाई मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. पालिकेच्या ‘बी’ विभागांत त्या सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या आणि मुंबई महापालिकेतले माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हेही राजकारणात येण्यापूर्वी आईला मदत करण्यासाठी इमारतींमधील कचरा गोळा करत असत.

यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदी विराजमान होताच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवतानाच त्यांना कोंदड वातावरणातून मोकळ्या हवेशीर वातावरणातील घरात राहता यावे यासाठी आश्रय योजना राबवून या प्रकल्पाला गती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या परिवारातील सदस्याला दिल्लीत निवडून पाठवण्याचा निर्धार सफाई कामगारांनी केला आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, मनसे महायुतीच्या उमेदवार म्हणून यामिनी जाधव या निवडणूक रिंगणात असून त्यांच्यासमोर मागील दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले उबाठा शिवसेनेचे अरविंद सावंत यांचे आव्हान आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून महापालिकेच्या सफाई कामगाराच्या सुनेलाच उमेदवारी दिली आहे. यशवंत जाधव राजकारणात आल्यानंतर, ते नगरसेवक झाल्यानंतरही त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. कारण ज्या नोकरीच्या जोरावर मी मुलांचे पालनपोषण केले, ती नोकरी मी सोडणार नाही असा पावित्रा घेत त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही काम केले.

मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून महापालिकेने दहा ते बारा वर्षांपासून घोषित केलेल्या आश्रय योजनेला यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष होताच गती देण्याचा प्रयत्न केला. सफाई कामगाराला आपल्या कुटुंबातील सदस्य मानणाऱ्या जाधव यांनी त्यांना मोकळ्या हवेशीर आणि प्रशस्त घरांमध्ये राहता यावे यासाठी मुंबईतील ३० ठिकाणच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत राबवण्यास मंजुरी दिली. त्यात दक्षिण मुंबईतील राजवाडकर स्ट्रीट, वालपाखाडी, फलटन रोड, ६४ जेल रोड,  ४२ जेल रोड, सिध्दार्थ नगर, टँक पाखाडी, पी जी सोलंकी,  एन एम जोशी मार्ग, शिश महल आदी ठिकाणच्या वसाहतींचा सामावेश आहे. या सर्व वसाहतींमधून जाधव यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content