Homeमुंबई स्पेशलबीकेसीत बुलेट ट्रेनचे...

बीकेसीत बुलेट ट्रेनचे स्थानक असणार रस्त्याच्या 10 मजले खाली!

मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे कॉरीडॉरवरील (बुलेट ट्रेन)च्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील भूमिगत स्थानकाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. इथले उत्खनन 30 मीटर खोल म्हणजे 10 मजली इमारतीइतके असून त्याचे सुमारे 84 टक्के काम आधीच पूर्ण झालं आहे. या स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सेवा मजला, असे 3 स्तर असतील. या स्थानकाला रस्ते आणि मेट्रो या दोन्ही प्रकारच्या जोडण्या मिळणार आहेत. प्रवेश आणि निर्गमनासाठी एक मेट्रो स्थानकाजवळ आणि दुसरा एमटीएनएल इमारतीजवळ असे 2 मार्ग असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त जागा, आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाइट्सची सोय असणार आहे.

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 323 किलोमीटर व्हायडक्टचे काम पूर्ण झाले आहे. 399 किलोमीटर पीयर कामही पूर्ण झाले आहे. पुलाच्या बांधकामातील टप्प्यांमध्ये नदीवरचे 17 पूल, 5 पीएससी पूल आणि 9 पोलादी पूल पूर्ण झाले आहेत. एकूण 211 किलोमीटर ट्रॅक बेड टाकण्यात आला आहे. संपूर्ण मार्गावर 4 लाखांहून अधिक ध्वनीरोधक बसवले गेले आहेत. पालघर जिल्ह्यात डोंगरातून जाणाऱ्या 7 बोगद्यांचे उत्खनन सुरू असून बीकेसी–शीळफाटा या 21 किलोमीटर एनएटीएम बोगद्यातल्या 5 किलोमीटर भागाचे काम पूर्ण झाले आहे. सूरत आणि अहमदाबादमधल्या रोलिंग स्टॉक डेपोंचे बांधकाम सुरू आहे. गुजरातमधल्या सर्व स्थानकांवर सुपरस्ट्रक्चर काम प्रगत टप्प्यात असून महाराष्ट्रातल्या 3 उन्नत स्थानकांवर काम सुरू झाले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानचे पायाभूत सुविधा व वाहतूक मंत्री हिरोमासा नाकानो यांनी काल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सूरत आणि मुंबईत सुरू असलेल्या बांधकामाच्या जागी भेट दिली. सूरतमध्ये ट्रॅकचा स्लॅब टाकण्याचे काम पाहिल्यानंतर त्यांनी रेल साइटवरील ट्रॅकच्या बांधकाम ठिकाणाला भेट दिली. येथे त्यांनी व्हायडक्टवर जे-स्लॅब बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टम बसवण्याच्या कामाची पाहणी केली. अलिकडेच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सूरत एचएसआर स्टेशनजवळच्या पहिल्या रूळ सांधेबदल यंत्रणेच्या स्थापनेचे निरीक्षण केले होते. त्याआधी सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाकानो यांचे पारंपरिक गरबा नृत्याने स्वागत करण्यात आले. सूरतचे खासदार मुकेश दलाल, महापौर दक्षेश मावानी, रेल्वे बोर्ड, एनएचएसआरसीएल आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Continue reading

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...
Skip to content