Homeकल्चर +.. कारण तेव्हा...

.. कारण तेव्हा जीपमध्ये ‘टायगर’ उद्धव ठाकरे होते!

एकदा जंगलात उघड्या जीपमधून फोटोग्राफी करताना वाघ पुढे पुढे येत होता. एक वाघीण अगदी जीपला घासून पुढे गेली. मी मात्र घाबरलो होतो. मात्र त्या वाघीणीने मागे वळूनसुद्धा बघितले नाही. कारण ‘टायगर’ उद्धव ठाकरे त्यात होते.. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हस्याचे फवारे उडले.

आपण त्यांना डिस्टर्ब केले नाही तर तेसुद्धा आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत. प्रत्येकाची देहबोली ओळखता आली पाहिजे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद असून ते एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. साधारण १९९७ सालापासून त्यांनी जंगलात जाऊन फोटोग्राफीला सुरूवात केली. नुकतेच त्यांनी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उद्धव ठाकरे – द टायगर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, या दोन पुस्तकांचे ऑनलाईन प्रकाशन केले. याप्रसंगी त्यांनी सुमारे २० मिनिटांच्या भाषणात त्यांना आलेले फोटोग्राफीतील थरारक रोमांचकारी अनुभव कथन केले.

जंगलात फोटोग्राफी करताना अनेकदा डॉ. दीपक सावंत माझ्याबरोबर होते. जंगलात वन अधिकारी आणि येथील नागरिक कठीण परिस्थितीत, टेन्शनमध्ये आपले जीवन जगत असतात. एकीकडे वन्यजीव, साप, विंचू यांचा सामना करताना त्यांना मलेरिया, टायफॉईड यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी मी व डॉ. सावंत औषधांसह वैद्यकीय पथक घेऊन गेलो. त्यावेळी प्रथमच कोणी येऊन आपली आरोग्य तपासणी केल्याबद्दल त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी डॉ. सावंत यांच्या माणुसकीचे दर्शन झाले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉक्टर तुम्ही मला फोटोग्राफीतले गुरू मानता हा तुमचा मोठेपणा आहे. सगळा जंगल प्रवास आणि घटना तुम्ही लेखणीतून साकार केल्याने या घटना ताज्या वाटतात. कॅमेरा कसा धरायचा, फोटो कसा क्लिक करायचा ही कला डॉ. सावंत यांच्यात आहे. तुम्ही कॅमेऱ्यातून जंगल टिपले आणि तुम्ही ते लेखणीत शब्दबद्ध केले. या पुस्तकातून तुमच्यातील एक साहित्यिक दिसला असून तुम्ही उत्तम साहित्याची निर्मिती केली असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ठाकरे

एकदा जंगलात फोटोग्राफी करताना मधमाशांच्या पोळ्यामधून मधमाशा उडाल्या. आम्ही कसाबसा बचाव केला. मात्र, दुसऱ्या वेळी जर असा प्रसंग उदभवला तर यावर कोणती इंजक्शने आहेत याची माहिती घेऊन डॉ. सावंत यांनी ती सोबत घेतली अशी माहितीही त्यांनी दिली.

या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रत्यक्ष स्वरूपात शिवसेना नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील केशवराव घैसास सभागृहात कोविड नियमांचे पालन करून संपन्न झाले. यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन बने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दोन पुस्तकांचे प्रकाशन इंकिंग इनोव्हेशनच्या आनंद लिमये यांनी केले आहे. राजकारणविरहीत हे पुस्तक असून त्यात मुख्यमंत्र्यांची एक वेगळी प्रतीमा मांडण्याचा प्रयत्न डॉ. दीपक सावंत यांनी केला आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचे वेगळेपण दिसून येते.

२०१० साली महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार गोरेगावच्या नेस्को संकुलात रक्तदानाचा महायज्ञ करून २५०६५ रक्तपिशव्या संकलन करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रम शिवसेनेने केला. ते डॉ. दीपक सावंत यांच्यामुळे शक्य झाले. एक चांगले डॉक्टर, कोणतेही काम करताना झोकून देऊन काम करणारा सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपक सावंत यांची आता लेखक म्हणून नवीन ओळख दिसून आली आहे. तुमचे पुस्तक वाचल्यावर तुम्ही एक कसलेले लेखक म्हणून समोर आले आहात. मोठे साहित्यिक म्हणून तुमचा गौरव होईल, असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनेकवेळा फोटोग्राफीला जाताना त्यांनी फोटोग्राफीची कला आत्मसात केली. त्यांच्याबरोबर फोटो काढायला मिळणे हे मोठे भाग्य असून हा मोठा ठेवा आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफीचा छंद जपला. त्यांनी जीव ओतून काम केले आणि जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यांची कामाची तळमळ, चिकाटी, संयम, वाट पाहण्याची वृत्ती या त्यांच्यात असलेल्या गुणांचा त्यांना मुख्यमंत्रीपदीही उपयोग झाला असेही देसाई म्हणाले.

आपल्या मनोगतात डॉ. दीपक सावंत यांनी, फोटोग्राफी करताना ठाकरे यांच्यातील माणूस मी जवळून बघितल्याचे सांगितले. टाईफॉईडची लस प्रत्येक वन अधिकाऱ्यांना दिली. ताडोबा जंगलाचे रूपडे पालटले. पेंडीअँटीक ऑन व्हील ही संकल्पना गावागावात पोहोचवली. त्यांचे फोटोग्राफीचे अचूक टायमिंग आणि क्लिक आत्मसात केले. त्यांची फोटोग्राफी वॉच करत हे पुस्तक साकार झाले. जंगल व वन्यजीव वाचला पाहिजे हा ध्यास घेत त्यांनी जंगले कशी सुधारतील याची काळजी घेतली. जंगल भ्रमंती करताना आपल्याला उद्धव ठाकरे कसे भावले याचे वर्णन व चित्रण या पुस्तकांमधून केले असल्याचे त्यांनी सांगितले. राजकरणात आपल्याला संधी मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content