Homeबॅक पेजमहाविकास आघाडीत ठाकरे...

महाविकास आघाडीत ठाकरे गट तिसऱ्या स्थानावर!

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने महाविकास आघाडीमध्ये नव्याने खळबळ उडाली आहे.

सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मोठा भाऊच आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये नंबर एकचे स्थान राष्ट्रवादीचे आहे. त्यानंतर नंबर दोनवर, आम्ही म्हणजे काँग्रेस आहोत. उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याचदृष्टीने सर्व निवडणुकांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल, असे संकेत त्यांनी दिले.

चार दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीतल्या जागावाटपासंबंधी भाष्य करत आहेत. या जागावाटपात लोकसभेच्या निवडणुकीत आमचा गट पूर्वीच्या शिवसेनेच्या जागांइतकाच म्हणजे 19 जागा लढवेल, असे ते म्हणाले. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेली परस्परांवरील कुरघोडी आता मोठ्या भावापर्यंत पोहोचली आहे.

कालच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, हा मोठा भाऊ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अजितदादांवर पलटवार करताना संजय राऊत यांनी कोण मोठा भाऊ हे ठरवण्यासाठी डीएनए टेस्ट करावी लागेल, असे भाष्य केले होते. त्यापाठोपाठ आज पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ्या भावाबद्दल वक्तव्य केले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content