Homeबॅक पेजअजूनही नावनोंदणी करू...

अजूनही नावनोंदणी करू शकतात शिक्षक व पदवीधर! 

भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नावनोंदणी करण्याकरिता निरंतर अद्यावतन कार्यक्रम (Continuous Updatation) प्रक्रिया सुरू राहणार आहे.

पुरवणी यादीच्या स्वरुपात मतदारांची नावे अंतिम मतदार यादीस जोडण्यात येतील. मात्र, या निवडणुकांच्या नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर मतदार यादीमध्ये कोणतीही दुरुस्ती/सुधारणा करता येणार नाही. 30 डिसेंबर 2023 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदारसंघाच्या अंतिम मतदारयाद्यांमध्ये पात्र  व्यक्तीचे मतदारयादीमध्ये नाव समाविष्‍ट नसेल, अशी व्यक्ती मतदारयादीमध्ये विहित प्रपत्रातील अर्जाद्वारे अद्यापही आपली नाव नोंदणी करु शकते, असे राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव म. रा. पारकर यांनी कळविले आहे.

पारकर यांनी म्हटले आहे की, विधान परिषदेच्या मुंबई व कोकण विभाग पदवीधर, मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2024मध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरिता मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात आाला. आता  अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या मतदारसंघामध्ये सन 2018मध्ये नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या व सन 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकांकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीतील मतदारांची संख्येची माहिती अशी:

मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ, ४५७३५, ९११२०.

कोकण विभाग पदवीधार विधान परिषद मतदारसंघ, १०४४८८, १७७४६५.

मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघ, ८७२२, १४५५८.

नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ, ५३८९२, ६४८०२.

पदवीधर मतदार नावनोंदणी करण्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज (प्रपत्र क्र.18) भरू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://gterollregistration.mahait.org/

ज्या पात्र शिक्षक मतदारांचे मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट नाही, असे पात्र शिक्षक मतदार नावनोंदणी करण्याकरिता ऑफलाईन अर्ज (प्रपत्र-19) त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत भरू शकतात. यासाठीचे अर्ज विभागीय आयुक्त (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी), संबधित जिल्हाधिकारी (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याचप्रमाणे, हा नमुना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads/DownloadForms/Form-18.pdf तसेच, Downloads/DownloadForms/Form-19.pdf व  Downloads/DownloadForms/Certificate -Form-19.pdf  येथेसुद्धा उपलब्ध आहे, असेही पारकर यांनी म्हटले आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content