Homeकल्चर +तापसी पन्नू ‘स्विस...

तापसी पन्नू ‘स्विस ब्युटी’ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर!

बॉलिवुड सुपरस्टार तापसी पन्नू आता स्विस ब्युटी, या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्डची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाली आहे. तापसीचा प्रभाव आणि ब्रॅण्डच्या उच्च-कार्यक्षम मेकअपसाठी तिची असलेली कटिबद्धता लोकांना सर्वोत्तम मेकअपची निवड करण्यास मदत करेल, असा कंपनीचा मानस आहे.

सर्वोत्तम टॅलेंट व अस्सल व्यक्तिमत्त्वासाठी सुप्रसिद्ध तापसी पन्नू देशभरातील लाखो प्रेक्षकांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे. तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि वास्तविक जीवनातील अनुभवांना खऱ्या स्वरूपात सादर करण्याची क्षमता स्विस ब्युटीच्या मुलभूत मूल्यांशी पूर्णपणे संलग्न आहे. या सहयोगाच्या माध्यमातून स्विस ब्युटीचा त्यांचा मेकअप अधिकाधिक व्यक्तींना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. तापसीचे अनेक चाहते आहेत, जे ब्रॅण्डच्या ग्राहक समूहाशी संलग्न आहेत. भारतात व्यापक चाहते असण्यासह तापसी पन्नूचा स्विस ब्युटीसोबतचा सहयोग ब्रॅण्डचे प्रभुत्व अधिक प्रबळ करण्याची आणि नवीन मार्ग खुले करेल, असा अंदाज आहे.

स्विस ब्युटीचे संचालक अमित व मोहित गोयल म्हणाले की, तापसीचे स्वावलंबी व्यक्तिमत्त्व स्विस ब्युटीच्या सर्वसमावेशक मेकअप लाइनशी पूर्णपणे संलग्न आहे. ब्रॅण्डचा टिकाऊ व आरामदायी उत्पादनांसह प्रत्येक मेकअपप्रेमीचा आवडता ब्रॅण्ड बनण्याचा मनसुबा आहे. आम्ही उद्योगामध्ये दशकाला साजरे करत असताना आम्हाला विश्वास आहे की, ब्रॅण्डसोबतचा तिचा सहयोग आमच्या ब्रॅण्डला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि ग्राहकांत वाढ होईल.

तापसी पन्नू या सहयोगाबाबत म्हणाली, ज्या ब्रॅण्ड्सच्या सांगण्यासाठी कथा आहेत ते ब्रॅण्ड्स महत्त्वाचे आहेत. स्विस ब्युटी त्याबाबतीत अग्रस्थानी असून मेकअपला विश्वासार्ह, आरामदायी, उच्च कार्यक्षम करण्यासाठी आपण कार्यरत राहू. मी नेहमीच किमतीपेक्षा अधिक उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादनांचा अवलंब केला आहे आणि स्विस ब्युटी या तत्त्वाला सामावून घेते. त्यांची मेकअप श्रेणी विविध निवडी देते, जे तरूणांचे व जवळपास सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

    स्विस ब्युटीचा तापसी पन्नूसोबतचा सहयोग सौंदर्य मानक पुनर्परिभाषित करण्याच्या आणि सर्वांसाठी उत्पादने असलेला मेकअप ब्रॅण्ड बनण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेमधील महत्त्वाचा टप्पा आहे. या सहयोगामध्ये तापसीचे करिष्माई व्यक्तिमत्त्व आणि स्विस ब्युटीची सर्वोत्तमतेप्रती समर्पितता समाविष्ट आहे, ज्यामधून सौंदर्य उद्योगात सकारात्मक परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे.

    Continue reading

    आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

    जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

    जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

    रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

    रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

    मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
    Skip to content