Homeब्लॅक अँड व्हाईटलाभ घ्या इझमायट्रिपच्या...

लाभ घ्या इझमायट्रिपच्या १५व्या वर्धापनदिनाचा…

इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने त्यांच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त मेगा सेल्स जाहीर केले आहेत. ट्रॅव्हल सेल्स व सूटचा हा भव्य उपक्रम १० जून २०२३पर्यंत असेल. ग्राहक व प्रवासप्रेमी इझमायट्रिप वेबसाइट व अॅपवर सेलच्या या नियोजित कालावधीदरम्यान बुक केलेली विमाने, हॉटेल्स, बसेस, कॅब्स, क्रूझेस व हॉलिडे पॅकेजेसवर व्यापक सूटसह अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

या वर्धापनदिन सेलदरम्यान प्रवासी देशांतर्गत विमानांवर जवळपास २४ टक्क्यांची सूट, आंतरराष्ट्रीय विमानांवर जवळपास ४० टक्क्यांची सूट आणि हॉटेल बुकिंग्जवर जवळपास ६० टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. इझमायट्रिप बस बुकिंग्जवर जवळपास १५ टक्क्यांची सूट आणि कॅब आरक्षणांवर जवळपास १४ टक्क्यांच्या सूटसह परिवहन गरजांचीदेखील पूर्तता करेल. वर्धापनदिन साजरीकरणाचा भाग म्हणून ब्रॅण्ड फक्त १५,९९९ रूपयांपासून सुरू होणारे अतुलनीय हॉलिडे पॅकेजेसदेखील देत आहे. या पॅकेजेसमध्ये गंतव्यांची व्यापक श्रेणी समाविष्ट आहे आणि विविध प्रवास पसंतींची पूर्तता करतात. यामधून प्रत्येक पर्यटकाला संस्मरणीय अनुभव मिळण्याची खात्री मिळते.

क्रूझ व्हेकेशनचा आनंद घेण्याचे स्वप्न असलेल्यांसाठी अॅनिव्हर्सरी सेल ५३,९९९ रूपयांपासून सुरू होणारे विशेष क्रूझ पॅकेजेस देतो. या ऑफर्स आरबीएल बँक क्रेडिट व डेबिट कार्ड, आयडीएफसी क्रेडिट कार्ड, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड आणि येस बँक क्रेडिट कार्ड यावर उपलब्ध आहेत. सेलच्या कालावधीदरम्यान सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना द मॅन कंपनी, गाना, पॉकेटएफएम, स्कायबॅग्ज, नेटमेड्स, असेम्ब्ली, स्किविया, आयमायआय, ग्रोफिल्टर, आयजीपी आणि कॅप्रीसी अशा निवडक ब्रॅण्ड सहयोगींकडून गिफ्ट वाऊचर्स मिळण्याची संधी असेल.

या अविश्वसनीय सूटचा लाभ घेण्यासाठी आणि गिफ्ट वाऊचर्स जिंकण्याची संधी मिळण्यासाठी ग्राहक बुकिंग प्रक्रियेदरम्यान कूपन कोड ‘इएमटी१५’चा वापर करू शकतात, ज्यामधून उत्तम बचतींची खात्री मिळेल.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक रिकांत पिट्टी म्हणाले की, आम्ही आमच्या सर्व ग्राहकांचे आभार मानतो, ज्यांनी इझमायट्रिपवर विश्वास दाखवला आहे आणि आम्हाला वर्षानुवर्षे त्यांचे पसंतीचे ट्रॅव्हल पार्टनर बनवले आहे. त्यांच्या अविरत पाठिंब्यामुळे आम्ही उद्योगामध्ये १५ वर्षं पूर्ण करण्याचा हा मोठा टप्पा पार केला आहे. या कौतुकाचे प्रतीक म्हणून आम्हाला ग्राहकांसाठी हृदयस्पर्शी गिफ्ट हा मेगा सेल सादर करण्याचा आनंद होत आहे. आम्ही अपवादात्मक प्रवास अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि आगामी वर्षांमध्ये आमच्या बहुमूल्य ग्राहकांना अधिक उत्तम समर्पिततेसह सेवा देण्यास उत्सुक आहोत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content