Homeमुंबई स्पेशलसमाजकंटकांवर त्वरित कारवाई...

समाजकंटकांवर त्वरित कारवाई करा!

शिवसेना कोल्हापूरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असून, काही समाजकंटक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्याचा आणि अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर करण्याचा निर्णय घेतला. मुघलांचे उदात्तीकरण या सरकारने थांबवायचे कार्य केले. त्यामुळे काही मुघलवादी लोकांना हे पटलेले आणि पचलेलेसुद्धा नाही. सगळ्या जातीधर्माच्या महाराष्ट्रवादी जनतेने या निर्णयाचं स्वागत केलं. पण मुघलवादी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी जनसामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम करत आहेत. अशा समाजकंटकांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार किरण पावसकर यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

काही राजकीय पक्ष आपली संस्कृती आणि निष्ठेला विसरून औरंगजेबप्रेमी असामाजिक तत्वांची भाषा बोलत आहेत. हे असं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील जनता खपवून घेणार नाही. काही राजकीय पक्ष या समाजकंटकांना छुपा पाठिंबा देतात. ते सहन केलं जाणार नाही. अशा कृतींना पाठिंबा देणं या पक्षांनी थांबवावं, असा इशारा त्यांनी दिला.

कायदा सुव्यवस्था जपणं हे सामान्य नागरिकांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या हिताचे निर्णय सगळ्यांनी शांतपणे स्वीकारायला हवेत. सगळ्या शिवसैनिकांना आमचं आवाहन आहे की कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी त्यांनी सगळ्या जनतेला प्रोत्साहित करावं. काही लोकांना 350वा राज्यभिषेक सोहळा मान्य नाही. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव गटाला सवाल आहे की तुम्ही औरंगजेबासोबत आहात की महाराष्ट्र राज्यातील जनतेसोबत?, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content