Homeकल्चर +दादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबलावादन स्पर्धा

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता छोट्या गटासाठी तबलावादन स्पर्धा आयोजित केली आहे (छोटा गट १० ते १५ वर्षे) तसेच रविवार दि. २७ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता मोठ्या गटासाठी तबलावादन स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे (मोठा गट १६ ते २५ वर्षे). या स्पर्धा संस्थेच्या सभागृहात होतील.

या स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहेत. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२३ असेल. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात, फेसबुकवर तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२२ २४३०४१५०

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content