Homeबॅक पेजकांद्यांचे दर रोखण्यासाठी...

कांद्यांचे दर रोखण्यासाठी ई-कॉमर्स आणि ई-ऑक्शनचा आधार!

या वर्षी साठा केलेल्या 3.00 लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरसाठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी 10.08.2023 रोजी नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाच्या (NCCF) व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली आणि या कांद्याची विक्री करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती या देशपातळीवरील किमतींच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत अशी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ज्या ठिकाणी मागील महिन्याच्या आणि वर्षाच्या तुलनेत किमतीत वाढ होण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे त्या ठिकाणी ई-ऑक्शनच्या माध्यमातून कांद्याची विक्री करणे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून कांद्याची किरकोळ विक्री करण्याचे ठरवण्यात आले.

ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दर आणि उपलब्धतेच्या परिस्थितीनुसार त्याचे प्रमाण आणि विक्री करण्याची गती देखील ठरवली जाईल. बाजारांमधल्या विक्री व्यतिरिक्त, राज्यांना त्यांच्या ग्राहक सहकारी संस्था आणि महामंडळांच्या विक्री केंद्रांमधून कांद्याची विक्री करता यावी यासाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

चालू वर्षात, बफर साठ्यासाठी एकूण 3.00 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे, परिस्थितीनुसार गरज भासल्यास  हा साठा आणखी वाढवता येईल . दोन केंद्रीय नोडल एजन्सी, म्हणून नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रत्येकी 1.50 लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी केला होता. साठवणुकीदरम्यान कांदा अधिक टिकवा यासाठी यावर्षी भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) च्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर कांद्याचे विकिरण हाती घेण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे 1,000 मेट्रिक टन कांद्यावर  विकिरण प्रक्रिया करण्यात आली आणि हा कांदा नियंत्रित तापमानात गोदामात साठवण्यात आला आहे .

कांद्याच्या दरामधील अस्थिरता रोखण्यासाठी केंद्र सरकार किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याचा बफर साठा ठेवत असते. दरवर्षी रब्बी कांदे खरेदी करून बफर साठा निर्माण केला जातो आणि तो कांद्याची मागणी वाढण्याच्या काळात मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये पाठवला जातो. गेल्या चार वर्षांत कांद्याच्या बफर साठ्याच्या क्षमतेत तिपटीने वाढ झाली असून वर्ष 2020-21 मध्ये 1.00 लाख मेट्रिक टन एवढा साठा असलेला कांदा वर्ष 2023-24 मध्ये 3.00 लाख मेट्रिक टन एवढा झालेला आहे. कांद्याच्या या बफर साठ्याने  ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content