Homeकल्चर +"सुपारी डॉट कॉम"ला...

“सुपारी डॉट कॉम”ला भा. रा. तांबे कृती पुरस्कार

मध्य प्रदेश शासनाचा “अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्कार” विख्यात रंगकर्मी योगेश सोमण यांच्या “सुपारी.com” या दोन अंकी नाटकाला जाहीर झाला आहे.

मध्य प्रदेश शासनाच्या संस्कृती विभागाच्या “मराठी साहित्य अकादमी”च्या विद्यमाने प्रतिवर्षी दोन मराठी साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात. वर्ष २०२०साठी योगेश सोमण यांच्या “सुपारी.com” या नाट्यलेखनाला आणि सुचेता घोरपडे यांच्या “खुरपं” या कादंबरीला “भा. रा. तांबे कृती पुरस्कार” बुधवारी घोषित झाला आहे.

रुपये ५१,०००/-, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. “मराठी गौरव दिवसा”निमित्त येत्या फेब्रुवारीत भोपाळ इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्काराचं वितरण होणार आहे. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content