Homeडेली पल्ससुनेत्रा पवारांनी केला...

सुनेत्रा पवारांनी केला प्रचाराचा शंखनाद

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सुपूर्द केला. या अर्जाद्वारे त्यांनी बारामतीच्या राजकीय रिंगणात आपली दावेदारी निश्चित केली असून, यावेळी समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. उमेदवारीअर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी कौटुंबिक परंपरेला आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाला प्राधान्य दिले. त्यांनी काटेवाडी येथे जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. राजकीय प्रवासाच्या या महत्त्वाच्या वळणावर घेतलेली ही भेट आणि मिळालेले आशीर्वाद सध्या बारामतीत चर्चेचा विषय ठरत आहेत.

अर्ज भरण्याच्या या प्रक्रियेनंतर आता बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा अधिक जोमाने उडणार आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्यात होणारी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, उमेदवारीअर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आता प्रत्यक्ष जनसंपर्कावर आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर भर देणार असल्याचे दिसून येत आहे. ज्या बारामतीत अजितदादांनी शेवटचा श्वास घेतला त्या बारामतीला आपण कधीही अंतर देणार नाही. बारामतीचा विकास हेच आपले ध्येय आहे. बारामतीकर हाच आपला परिवार आहे, असे सुनेत्रा पवार यांनी मतदारांशी साधलेल्या संवादात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...

इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू! तात्पुरत्या युद्धविरामाला नकार!!

इराणच्या सुरक्षायंत्रणेला सोमवारी मोठा हादरा बसला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खादेमी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी,...
Skip to content