Homeन्यूज ॲट अ ग्लांसअजित पवारांच्या अपघाती...

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला ‘खराती’ वळण?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता एक वेगळे वळण मिळाले असून तपासात काही धक्कादायक दुवे समोर आले आहेत. २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेच्या संदर्भात नवीन माहिती उजेडात आल्याने, या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी ‘अशोक खरात’ नावाच्या व्यक्तीच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) आणि मोबाईल संदेशांबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. अपघाताच्या नेमक्या कालावधीत खरातच्या मोबाईलवर झालेले संदेश आणि एका पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहार यांचा या घटनेशी काही संबंध आहे का, असा सवाल दमानिया यांनी पुराव्यांसह उपस्थित केला आहे.

या नवीन खुलाशानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, हे संवेदनशील कॉल रेकॉर्ड्स लीक कसे झाले, याबद्दलही सरकारने कडक तपासाचे आदेश दिले असून, आगामी काळात या प्रकरणातून मोठे सत्य समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content