Homeकल्चर +सुलोचना देवलकर यांचे...

सुलोचना देवलकर यांचे ‘स्वरसाधक’ प्रकाशित!

सुप्रसिद्ध पत्रकार व गायिका सुलोचना देवलकर यांच्या ‘स्वरसाधक’ या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या उन्मेष प्रकाशनातर्फे नुकतेच झाले. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपली उत्तुंग कारकीर्द घडवणाऱ्या पंधरा दिग्गज कलावंतांच्या सांगितिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. या सर्व दिग्गजांशी मुलाखतींच्या निमित्ताने साधलेला मनमोकळा संवाद यात मांडण्यात आला आहे. यातील कित्येक कलाकार आता हयात नसल्यामुळे तर या मुलाखती अधिकच मौलिक झाल्या आहेत.

पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. जसराज, पं. वसंतराव देशपांडे, विदुषी किशोरी आमोणकर, पं. हरी प्रसाद चौरसिया, डॉ. सुशिलाताई पोहनकर, डॉ. शामला भावे, पं. अजय पोहनकर, पं. डी. के. दातार, पं. जयराम आचार्य, उस्ताद दिलशाद खान, बेगम परवीन सुलताना, अण्णा जोशी, विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि विदुषी कौशिकी चक्रवर्ती यांची व्यक्तिचित्रे या मुलाखतींमधून रेखाटण्यात आले आहे.

लेखिकेने मुलाखतींमधून या कलाकारांची संगीतसाधना, आयुष्याची क्षणचित्रे, करावा लागलेला संघर्ष, आलेले अनुभव, मिळालेले मानसन्मान यांसह कलाकारांचे शक्य तितका परिचय यानिमित्ताने मांडला आहे. संगिताच्या क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीतील कलाकारांनी हे पुस्तक जरूर वाचावे आणि या कलावंतांच्या वाटचालीतून प्रेरणा घ्यावी व आपल्या संगीतसाधनेचे मार्ग शोधावेत, या हेतूनेच सुलोचना देवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

या पुस्तकाला विख्यात गायिका आशा खाडिलकर यांनी प्रस्तावना लिहीली आहे तर अतिशय समर्पक असा शुभेच्छासंदेश सुप्रसिद्ध साहित्यिका माधवी कुंटे यांनी दिला आहे. हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे. पृष्ठे- १४३, किंमत- २०० रूपये. अमेझॉनवर रु. १९०/- हे पुस्तक मुंबईत विलेपार्ले पूर्वच्या जवाहर बुक डेपो तसेच मॅजेस्टिक बुक हाऊसमध्येही उपलब्ध आहे.

त्याची लिंक- https://www.amazon.in/dp/9385794779?ref=myi_title_dp

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content