Homeकल्चर +ज्येष्ठ गायिका डॉ....

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार

आपले आई वडील व गुरुजन आज हयात नसले तरीही श्रोते हाच आपला सांगीतिक परिवार आहे. साधक आणि कलाकार या दोन्ही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडू शकलो याचा आपल्याला आनंद वाटतो, असे प्रतिपादन डॉ. प्रभा अत्रे यांनी काल केले.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते दीनानाथ नाट्यगृह येथे बुधवारी (दि. २३) सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. हृदयेश आर्टतर्फे आयोजित या सत्कार सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पं. हरिप्रसाद चौरसिया, राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, माध्यमकर्मी राजीव खांडेकर व हृदयेश आर्टचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जीवन माझे सुरासंगती, अर्पियले मी रसिका तुजसी.. या ओळी उद्धृत करून डॉ. प्रभा अत्रे यांनी श्रोते हाच आपला मोठा पुरस्कार असल्याचे यावेळी सांगितले.

संगीत, कला व साहित्य हा साधनेचा विषय आहे. शास्त्रीय संगीत समजण्यासाठीदेखील थोडीफार साधना करावी लागते. बिगर शास्त्रीय गाण्यांनी काही काळ आनंद जरूर मिळतो, परंतु मानसिक, आत्मिक व आध्यात्मिक आनंद शास्त्रीय संगीतातच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.

संगीत केवळ मौजमस्तीसाठी नसून मनुष्याला पशुत्व व भौतिकतेच्या वर उचलून परमात्म्याशी तादात्म्य साधण्यास सहाय्यक असे साधन आहे. प्रभाताईंच्या शिष्यांनी त्यांचा सांगीतिक वारसा पुढे न्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content