Homeकल्चर +काळा घोडा महोत्सवात...

काळा घोडा महोत्सवात दिसणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या प्रसिद्ध काळा घोडा महोत्सवात यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे. सिनेनिर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा बनवण्यात येणार आहे.

काळा घोडा महोत्सवात येणाऱ्या चोखंदळ आणि हौशी प्रेक्षकांसाठी नेहमीच विविध कलाकृती सादर केल्या जातात. यावर्षी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या लंबी रेस का घोडा, या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार केला जात आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी तयार केलेला हा घोडा म्हणजे प्रत्येक कलाकाराला दिलेली मानवंदनाच असणार आहे. या शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य तांत्रिक टाकाऊ वस्तूतून आणि पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरातूनच करण्यात येणार असून डॉ. सुमित पाटील यांनी या शिल्पाचे कलादिग्दर्शन केले आहे.

शाश्वत सिनेनिर्मिती या संकल्पनेवर या कलाकृतींच्या माध्यमातून भर देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांनी सांगितले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content