Homeपब्लिक फिगरशरद पवारांनी केले...

शरद पवारांनी केले एनसीपी अॅपचे उद्घाटन!

समाजकारण, राजकारण बदलत आहे. परंतु आज महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. शाहू – फुले – आंबेडकर यांच्या दूरदृष्टीच्या सूत्रावरच राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. यावेळी पवार यांच्या हस्ते एनसीपी अ‍ॅपचे उद्घाटनही झाले.

आज नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८१वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमचा पक्ष एका विचाराने देशात आणि राज्यात काम करत आहे. बांधिलकी असलेले कार्यकर्ते पक्षात आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी झटणारा हा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी पुढचा विचार त्यावेळी केला होता. बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढची होती. देशातील मोठया धरणातून शेती व वीज निर्मिती केली पाहिजे हा विचार त्यांनी अगोदर मांडला होता, याची माहितीही त्यांनी दिली.

महिलांना हक्क मिळवून देणार्‍या कर्मयोग्याचा वाढदिवस – अजित पवार

पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणजे… वंचितांना… महिलांना हक्क मिळवून देणार्‍या… कर्मयोग्याचा वाढदिवस आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रत्येक कार्यक्षेत्रावर पवारसाहेबांचा ठसा आहे. या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची आहे. पवारसाहेब आपली प्रेरणा आणि स्फूर्ती आहे, असेही ते म्हणाले.

ही किमया फक्त पवारसाहेबच करू शकतात – प्रफुल पटेल

दिल्लीत पवारसाहेबांचा ७५वा वाढदिवस पार पडला त्यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधानांपासून सर्वच लोक आपले राजकीय मतभेद विसरत उपस्थित राहिले होते. एवढ्या लोकांना एका छताखाली आणणे सोपे नाही. ही किमया फक्त पवारसाहेब करू शकतात आणि हीच त्यांची खरी कमाई आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अडखळणे, या पावलांना पसंत नाही!- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाखाली पवारसाहेबांनी हे कुटूंब तयार केले आहे. भावनांच्या धाग्याने हा परिवार त्यांनी गुंफला आहे. शरदचंद्र पवार या चंद्राच्या चांदण्याने कित्येक आयुष्य प्रकाशमान करून टाकले आहे, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले.

अनेकजण म्हणतात पवारसाहेबांचं राजकारण unpredictable आहे. त्यांचा काही नेम नाही… पण त्यांचा नेम इतका अचूक असतो की त्यांनी घेतलेल्या निर्णयाने एक सामाजिक परिवर्तन घडतं. उदाहरणार्थ मराठवाडा विद्यापीठ नामांतर, महिला आरक्षण, महाविकास आघाडी असेही जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेबांचं आयुष्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की मार्ग सापडत नाही, अडचणींचा विळख्यात आपण सापडलोय… तेव्हा पवारसाहेबांचं चित्र डोळ्यासमोर आणलं की आपल्याला नक्कीच लढण्याची जिद्द मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपला योद्धा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल – नवाब मलिक

देशात वैचारिक लढाई उभारण्याची गरज असून आपला योद्धा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाला विरोध करणार्‍यांना खड्यासारखे बाजूला करा – छगन भुजबळ

या देशातील सर्व आरक्षण संपवण्याचा विचार रुजत आहे. जे या आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांना येत्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात जो चमत्कार केलात तोच चमत्कार २०२४मध्ये दिल्लीत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी एनसीपी अ‍ॅपचे उद्घाटन शरद पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी आपले विचार मांडले. पवारसाहेब व प्रतिभाताई पवार यांचा एकत्रित सत्कार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतील ‘शरद पवार माझ्या शब्दात’ या निबंध पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यावेळी साहेबांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला. महाराष्ट्र युथ कार्निव्हल लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार माजिद मेमन, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक सेलचे जयदेव गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, आदी उपस्थित होते.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content