Homeब्लॅक अँड व्हाईटदिल्ली सरकारविरोधातल्या विधेयकाला...

दिल्ली सरकारविरोधातल्या विधेयकाला पवारांचा पाठिंबा

‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आणि शरद पवार यांनी दिल्लीतील आप सरकारला राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आमदारांचे घोडेबाजार करुन, ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भय निर्माण करण्यासाठी आणि लोकप्रिय सरकारच्या विरोधात अध्यादेश जारी करून गैरभाजपा सरकार पाडण्यासाठी अन्यायकारक मार्ग वापरत असल्याचे सांगितले. दिल्लीत कायदेशीररीत्या निवडून आलेल्या आप सरकारचे अधिकार मर्यादित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली दुरुस्ती विधेयक २०२३ अंमलात आणले आणि त्या प्रभावाखाली एक अध्यादेश जारी केला आहे, असे केजरीवाल यांनी पवार यांना सांगितले. त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी, शरद पवार हे देशातील सर्वात वरीष्ठ नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी संसदेत या विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि इतर गैरभाजपा पक्षांशी बोलले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

असे अध्यादेश आणणे म्हणजे देशातील संसदीय लोकशाही मर्यादित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीचे खासदार या विधेयकाला संसदेत विरोध करतील असे आश्वासनही त्यांनी केजरीवाल यांना दिले. ५६ वर्षांच्या संसदीय जीवनात निवडून आलेल्या सरकारवर असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत पवार यांनी मांडले, अशी माहितीही तपासे यांनी दिली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content