Homeहेल्थ इज वेल्थकेसांच्या समस्यांवर शॅम्पू...

केसांच्या समस्यांवर शॅम्पू आणि कंडिशनरची मात्रा..

होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने केसांच्या समस्यांवरील उत्पादने नुकतीच सादर केली आहेत. यात प्रो+ हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू, प्रो+ कंडिशनर, प्रो+ हेअरफॉल कंट्रोल सीरम आदींचा समावेश आहे.

प्रो+ हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू– हे सल्फेट, सिलिकॉन आणि पॅराबिन यांचा समावेश नसलेले मिश्रण असून, ते टाळू आतपर्यंत स्वच्छ करते, केसगळती आटोक्यात आणते आणि दरवेळी धुतल्यानंतर तुमचे केस मुलायम करून त्यातील गुंताही सोडवते. हा सौम्य शॅम्पू रासायनिक हानी पोहोचलेल्या आणि पुनरुज्जीवनाची आवश्यकता असलेल्या केसांसाठी उत्तम आहे. मोरक्कन अर्गन तेल, थुजा आणि ऑलिव्ह तेलाचा समावेश असलेला हा शॅम्पू केवळ तुमच्या केसाचे पोषण करत नाही, तर त्यांच्या वाढीलाही उत्तेजन देतो. हा शॅम्पू केस तुटण्यास प्रतिबंध करणाऱ्या नैसर्गिक घटकांनी समृद्ध आहे. हा सौम्य शॅम्पू केस व टाळू स्वच्छ करतो, मोरक्कन अर्गन तेल टाळू व केस आर्द्र राखते, दररोज होणाऱ्या हानीपासून केसाचे रक्षण करते, केसामधील कुपांची (फॉलिकल) हानी भरून काढते, केसाची दुभंगलेली टोके सांधते आणि केस कुपांच्या वाढीला उत्तेजन देते.

प्रो+ हेअर केअर उत्पादनांची श्रेणी, केसांचे खोलवर पोषण करणाऱ्या सौम्य घटकांपासून तयार करण्यात आली आहे. प्रो+ कंडिशनरमध्ये केस निरोगी व गुंतामुक्त ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. मोरोक्कम अर्गन तेलामुळे केसातील आर्द्रता टिकून राहते आणि दररोजच्या हानीपासून केसाचे संरक्षण होते. ग्रीन टीमुळे केस चमकदार व मुलायम होतात. एरंडेल तेलामुळे (कॅस्टर ऑइल) प्रज्वलन कमी होऊन केस तुटण्याचे प्रमाण आटोक्यात येते. हॉर्सटेल वनस्पतीच्या अर्कामुळे केसांची शुष्कता कमी होते आणि मजबूती वाढते. थुजामुळे केसगळती कमी होते आणि केसाच्या वाढीला चालना मिळते.

प्रो+ हेअर फॉल नॅचरल सीरम– हे एक हेअर केअर उत्पादन आहे. ते लॅरिक्स युरोपीया अर्काने तसेच कॅमेलिया सिनेन्सिस अर्काने समृद्ध आहे. लॅरिक्स युरोपिया अर्कामध्ये नैसर्गिक वनस्पतीजन्य वाढीचे घटक असतात. त्यामुळे केसांच्या वाढीला उत्तेजन मिळण्यात तसेच केसगळती रोखण्यात मदत होऊ शकते. कॅमेलिया सिनेन्सिस अर्क हा अँटिऑक्सिडण्ट्सने समृद्ध आहे आणि त्यामध्ये प्रज्वलनाचा प्रतिकार करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे टाळू थंड राहते आणि निरोगी केसांच्या वाढीला उत्तेजन मिळते. हे सीरम नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले आहे आणि सल्फेट्स, पॅराबिन्स यासारख्या तीव्र रसायनांचा तसेच कृत्रिम सुगंधांचा वापर यात करण्यात आलेला नाही. हे सीरम सर्व प्रकारच्या केसांसाठी अनुकूल आहे आणि केसांच्या निरोगी वाढीला चालना देण्यासाठी तसेच केसगळती कमी करण्यासाठी नियमितपणे वापरले जाऊ शकते.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content