Homeहेल्थ इज वेल्थशरीराचे स्क्रिनिंग करा...

शरीराचे स्क्रिनिंग करा आणि कॅन्सरला वेळीच रोखा!

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, प्रदूषण, वाढती व्यसनाधीनता अशा विविध कारणांमुळे जगासह देशात-मुंबईत कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच कॅन्सरच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी मुंबईतल्या प्रख्यात बाँम्बे हाँस्पिटलने माफक दरात संपूर्ण शरिरातील कॅन्सर ‘स्क्रीनिंग’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील कॅन्सरचे निदान वेळीच होऊन तिच्यावर वेळेवर उपचार सुरू करता येतील, असे बाँम्बे हाँस्पिटलचे कॅन्सर सर्जन व डीएनबी आँन्कोसर्जरीचे मुख्य समन्वयक डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले.

कॅन्सरच्या जनजागृतीसाठी मागील आठवड्यात ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ साजरा झाला. या दिवसाच्या निमित्ताने कॅन्सरची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. बेंगळुरूमधील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार स्त्री व पुरुषांमध्ये विविध प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण वाढतेय. स्तनाच्या कॅन्सर रुग्णांची १३.५ टक्के, तोंडाच्या १०.३ टक्के, गर्भाशयाच्या ९.४ टक्के, फुफ्फुसाच्या ५.५ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. विविध वयोगटातील १३ लाख २४ हजार ४१३ स्त्री-पुरुषांना कॅन्सर झाल्याची आकडेवारी आहे.

महिलांमधील कॅन्सरची आकडेवारी तर अधिकच चिंताजनक आहे. २०१५मध्ये देशातील १ लाख ८० हजार २५२ महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर आढळून आला. २०२०मध्ये हेच प्रमाण २ लाख ५ हजार ४२४वर गेले. २०२५मध्ये हेच प्रमाण २ लाख ३२ हजार ८३२वर जाण्याची भीती कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने वर्तवली आहे. २०१५मध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या ६५ हजार ९७८ केसेस होत्या. २०२०मध्ये ७५ हजार २०९ केसेस झाल्या. २०२५मध्ये ८५ हजार २४१ केसेसची शक्यता आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे. इतर खासगी रुग्णालयात ‘कॅन्सर स्क्रिनिंग’ची सुविधा अभावानेच उपलब्ध आहे. त्यामुळे कॅन्सरला रोखण्यासाठी बाँम्बे हाँस्पिटलने ‘कॉस्ट टू कॉस्ट’ दरात कॅन्सर स्क्रिनिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कॅन्सर दिनाच्या निमित्ताने मुंबईचे माजी शेरीफ डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी रुग्णालयाचे प्रमुख व कॅन्सर तज्ज्ञ उपस्थित होते. आता सर्वांसाठी कॅन्सरवरील चाचणीसुविधा माफत दरात उपलब्ध झाली आहे. यामध्ये मॅमोग्राफी, पॅपस्मिअर, ट्युमर मार्कर, पीएसए, छातीचे एक्स रे, अल्ट्रासाउंड निदान आदी चाचण्या होतील. त्याचदिवशी रिपोर्ट मिळतील. सीटी स्कॅन, एमआरआय, पेटस्कॅनसारख्या महागड्या व अनावश्यक चाचण्या टाळून योग्य पद्धतीने कॅन्सरचे वेळीच निदान करून पुढील महागडे उपचार टाळता येतील.

कॅन्सरचे निदान लवकर झाले तर बहुतांश केसेसमध्ये कॅन्सर बरा होऊ शकतो. मुंबईत खासगी रुग्णालयात आरोग्य तपासणी होते. पण ‘कॅन्सर स्क्रिनिंग’ उपलब्ध नाही. म्हणूनच बाँम्बे हाँस्पिटलमध्ये तीस ते साठ वर्षे वयोगटासाठी माफक दरात कॅन्सर तज्ज्ञांमार्फत संपूर्ण शरिराचे कॅन्सर ‘स्क्रिनिंग’ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content