Homeएनसर्कल‘वाघशीर’ या स्कॉर्पिन...

‘वाघशीर’ या स्कॉर्पिन पाणबुडीची पहिली सागरी सफर सुरू

भारतीय नौदलाच्या प्रकल्प-75चा भाग असलेल्या कलवरी वर्गातील 11880 यार्डच्या वाघशीर, या सहाव्या पाणबुडीने गुरूवारी, 18 मे 2023 रोजी पहिली सागरी चाचणी सुरू केली. मुंबईतल्या माझगाव गोदी जहाजबांधणी कंपनीच्या (एमडीएल) कान्होजी आंग्रे बंदरातून 20 एप्रिल 2022 रोजी या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले होते. या पाणबुडीच्या सागरी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, आगामी वर्ष 2024च्या सुरुवातीला ही पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात येईल.

गेल्या 2 महिन्यांच्या काळात एमडीएलने प्रकल्प-75 अंतर्गत तीन पाणबुड्यांचे वितरण केले आहे. यातील सहाव्या पाणबुडीच्या सागरी चाचण्यांची सुरुवात हा या प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आत्मनिर्भर भारत प्रत्यक्षात साकारण्याला मोठी चालना मिळत असल्याचेच हे निदर्शक आहे, असे मानले जाते. या वाघशीर, पाणबुडीतील प्रॉपल्शन प्रणाली, शस्त्रात्रे तसेच संवेदके यासह सर्व यंत्रणांना आता अत्यंत कठोर सागरी चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content