Homeएनसर्कलपरळीत संत सावता...

परळीत संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता!

येथील संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहरातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील सात दिवसापासून मंदिरात सुरू असलेल्या समाधी सोहळ्याची सांगता सोमवारी काल्याच्या कीर्तनाने झाली. माळी समाजाने मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते तर टाळ मृदंगाचा गजर आणि हलगी लेझीम पथकाच्या निनादाने संपूर्ण परळी शहर भक्तिमय झाले होते.

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मागील सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सात दिवसात महाराष्ट्रातील प्रसिद्ध हरिभक्त पारायण कीर्तनकार महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन साथ ही दिवस करण्यात आले होते. विशेष म्हणजे साथ ही दिवस समाजातील अन्नदात्यांनी दररोज दोन दिवस महापंक्तीचे आयोजन करण्यात येत होते अखंड साथी दिवस हरिनामाच्या गजरासह अन्नदान अविरत चालूच होते.

सात दिवसापासून हरिनामाच्या गजरात भक्तिमय झालेल्या मंदिर परिसर आज संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीने गजबूजून गेला होता केवळ माळी समाज नव्हे तर या परिसरातील अठरापगड समाजातील महिला पुरुष बालवृद्ध आधी भाविकांनी दररोज किर्तन ज्ञानेश्वरी पारायण भजन आणि पोथी अशा सर्वच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला अशा सात दिवस चालणाऱ्या श्री संत सावता महाराज समाधी सोहळ्यात आज सातव्या दिवशी संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी कीर्तन होऊन दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली होती.

गणेशपार मार्गे अंबिवेश वैद्यनाथ मंदिर चे मित्र नागा संत सोपान काका मंदिर नेहरू चौक टावर मोंढ्यातील मारुती मंदिर आर्य समाज रोड जाजूवाडी विठ्ठल मंदिर पद्मावती मार्गे दिंडी गणेश पार रस्त्याने संत सावता महाराज मंदिरात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विसर्जित करण्यात आली या दिंडी सोहळ्यात परळी सह पंचक्रोशीतील भाविक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते दिंडीतील कलशधारी महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होते तर समोर असलेले ध्वज आणि टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम च्या गजराने अक्षरशः परळी शहर दुमदुमून गेले होते या दिंडी सोहळ्यानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोक बंदोबस्त तैनात केला होता तर समाज बांधवांनीही सर्व दक्षता आणि पोलिसांचे नियम पाळून दिंडी सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पाडला. दरम्यान या सात दिवसात चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर सोहळा सप्ताहाची सांगता दिनांक 17 रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content