Homeएनसर्कल२१ एप्रिलला पुण्यात...

२१ एप्रिलला पुण्यात सनातन गौरव दिंडी

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुण्यात येत्या २१ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता महाराणा प्रताप उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक डेक्कन अशा ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

या गौरव दिंडीमध्ये ५०हून अधिक धार्मिक संस्था आणि संप्रदाय यांची पथके सहभागी होणार आहेत. समस्त हिंदूंनी जात, पक्ष, संप्रदाय विसरून एक सनातन धर्मप्रेमी हिंदू म्हणून या सनातन गौरव दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांनी स्वतःचे बॅनर, पथक, पथसंचलन या माध्यमांतून उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले आहे.

पुण्यात पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सनातन संस्थेचे चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, अधिवक्ता मंगेश जेजुरीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सनातन गौरव दिंडी पायी निघणार असून दिंडीचा आरंभ महाराणा प्रताप उद्यान (भिकारदास मारुति मंदिर चौक, बाजीराव रस्ता) येथून होऊन बाजीराव रस्ता मार्गे लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, डेक्कन असा तिचा प्रवास होईल. तेथेच तिची सांगता होईल. ‘सनातन गौरव दिंडी’त भगवे ध्वज, पारंपरिक पोशाख, विविध पथके, विविध देवतांच्या पालख्या अशाप्रकारे दिंडीचे स्वरूप असेल, असेही त्यांनी सांगितले.

१९९९मध्ये सनातन संस्थेची स्थापना झाली असून तेव्हापासून संस्थेचे अखंडपणे सनातन धर्माच्या प्रचाराचे कार्य आणि हिंदू एकतेचे कार्य चालू आहे. सनातन ही समाजाची आध्यात्मिक सेवा करणारी, श्रद्धासंवर्धन चळवळीतील एक अग्रणी संस्था आहे. संस्थेच्या वतीने समाजातील विविध वर्गांसाठी मानसिक तणाव नियंत्रण कार्यशाळा, शाळांमध्ये आध्यात्मिक प्रश्नमंजुषा, नैतिक मूल्यांविषयी व्याख्याने, समाजासाठी व्यसनमुक्तीसाठी प्रवचन, विनामूल्य आरोग्य शिबिर, मंदिर स्वच्छता आदी सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात, असेही राजहंस म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content