Homeएनसर्कलजुलै ते सप्टेंबरपर्यंत...

जुलै ते सप्टेंबरपर्यंत पहिल्या ८ शहरांत सव्वा लाख घरांची विक्री!

आरईए इंडियाची मालकीहक्‍क असलेली आणि हाऊसिंग डॉटकॉम व मकान डॉटकॉमची मूळ कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉम या आघाडीच्‍या डिजिटल रिअल इस्‍टेट ब्रोकरेज कंपनीने आपला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३’ नुकताच जारी केला. या अहवालामधून निदर्शनास येते की, निवासी सदनिकांची (घरांची) विक्री तिसऱ्या तिमाहीमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील ८३,२२० युनिट्सवरून १,०१,२२० युनिट्सपर्यंत वाढली आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंत देशातल्या पहिल्या ८ शहरांत सव्वा लाख घरांची विक्री झाली.

भारतातील आघाडीच्‍या आठ निवासी बाजारपेठांनी कॅलेंडर वर्षाच्‍या तिसऱ्या तिमाहीदरम्‍यान (जुलै ते सप्‍टेंबर २०२३) विक्रीमध्‍ये २२ टक्‍के आणि नवीन पुरवठ्यामध्‍ये १७ टक्‍क्यांची वाढ केल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. चेन्‍नई वगळता सर्व शहरांनी विक्रीत वाढीची नोंद केली, जेथे मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पुणे यांचे एकूण आकारमानामध्‍ये जवळपास निम्‍मे योगदान होते.

प्रॉपटायगर डॉटकॉमच्या त्रैमासिक अहवालात दिल्ली-एनसीआर, एमएमआर, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या आठ प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठांचा मागोवा घेण्‍यात आला आहे.

आरईए इंडियाचे सीएफओ आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्‍यवसाय प्रमुख विकास वाधवान म्‍हणाले की, अव्‍वल आठ शहरांमधील गृहनिर्माण बाजारपेठांनी विकासाची गती कायम ठेवली आहे. प्रबळ मागणीचे श्रेय सकारात्‍मक ग्राहक भावनेला जाते. श्री. वाधवान यांनी विक्रीमधील वाढीचे प्रमुख स्रोत म्‍हणून वाढती मागणी, वाढते डिस्‍पोजेबल उत्‍पन्‍न, स्थिर व्‍याजदर आणि नवीन गुंतवणूकदार मागणी यांसारख्‍या घटकांना निदर्शनास आणले.

प्रॉपटायगर डॉटकॉम डेटामधून निदर्शनास येते की, अहमदाबादमधील वार्षिक गृहनिर्माण विक्रीत ३१ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ७,८८० युनिट्सवरून १०,३०० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील विक्रीत ६० टक्‍क्‍यांच्‍या अधिकतम वाढीसह ७,८९० युनिट्सवरून १२,५९० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. दिल्‍ली-एनसीआरने विक्रीमध्‍ये ५,४३० युनिट्सवरून ७,८०० युनिट्सपर्यंत ४४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. हैदराबादमधील विक्रीत १०,५७० युनिट्सवरून १४,९९० युनिट्सपर्यंत ३४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. कोलकातामधील विक्रीत ४३ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, ज्‍यामुळे सदनिकांच्‍या विक्रीत २,५३० युनिट्सवरून ३,६१० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विक्रीत २८,८०० युनिट्सवरून ३०,३०० युनिट्सपर्यंत फक्‍त ५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, ज्‍यासाठी उच्‍च मूल्‍य कारणीभूत आहे. पुण्‍यातील विक्रीत १५,७०० युनिट्सवरून १८,५६० युनिट्सपर्यंत १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. चेन्‍नई ही एकमेव बाजारपेठ आहे, जेथे विक्रीत १२ टक्‍क्‍यांची घट झाली आहे, ज्‍यामुळे सदनिकांच्‍या विक्रीत ४,४२० युनिट्सवरून ३,८७० युनिट्सपर्यंत घट झाली.

विक्री (२०२३ ची तिसरी तिमाही वि. २०२२ ची तिसरी तिमाही):

त्रैमासिक विक्री
शहर२०२३२०२२तिमाही-ते-तिमाहीवार्षिक
२०२३ ची तिसरी तिमाही२०२३ ची दुसरी तिमाही२०२२ ची तिसरी तिमाही
अहमदाबाद१०,३००८,४६०७,८८०२२ टक्‍के३१ टक्‍के
बेंगळुरू१२,५९०६,७८०७,८९०८६ टक्‍के६० टक्‍के
चेन्‍नई३,८७०३,०५०४,४२०२७ टक्‍के-१२ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर७,८००३,२३०५,४३०१४१ टक्‍के४४ टक्‍के
हैदराबाद१४,१९०७,६९०१०,५७०८५ टक्‍के३४ टक्‍के
कोलकाता३,६१०१,९४०२,५३०८६ टक्‍के४३ टक्‍के
मुंबई३०,३००३०,२६०२८,८००० टक्‍के५ टक्‍के
पुणे१८,५६०१८,८४०१५,७००-२ टक्‍के१८ टक्‍के
भारत१,०१,२२०८०,२५०८३,२२०२६ टक्‍के२२ टक्‍के

स्रोत- रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३, हाऊसिंग रिसर्च

वाधवान पुढे म्‍हणाले की, नामांकित विकासकांसंदर्भात मागणीसह बाजारपेठेत वाढ होत आहे, ज्‍यामुळे गृहखरेदीदारांमध्‍ये बांधकाम सुरू असलेल्‍या प्रकल्‍पांबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्‍हती. तिसऱ्या तिमाहीमध्‍ये विक्री करण्‍यात आलेले १४ टक्‍के युनिट्स रेडी टू मूव्ह इन होते आणि विक्री करण्‍यात आलेल्‍या ३१ टक्‍के युनिट्सची किंमत १ कोटी रूपयांहून अधिक होती.

नवीन पुरवठ्यासंदर्भात अहमदाबाद १६,६७० युनिट्सपर्यंतच्‍या मोठ्या वाढीसह अग्रस्‍थानी आहे, तर इतर शहरांनी मिश्रित ट्रेण्‍ड्स दाखवले. पण, एकूण स्थिती सकारात्‍मक राहिली, जेथे आठ बाजारपेठांमधील लाँचेस् १७ टक्‍क्‍यांची वाढ होत १२३,०८० नवीन युनिट्सपर्यंत पोहोचले.

नवीन पुरवठ्यामध्‍ये अहमदाबाद अग्रस्‍थानी:

त्रैमासिक नवीन पुरवठा
शहर२०२३२०२२तिमाही-ते-तिमाहीवार्षिक
२०२३ ची तिसरी तिमाही२०२३ ची दुसरी तिमाही२०२२ ची तिसरी तिमाही
अहमदाबाद१६,६७०२१,५००८,१९०-२२ टक्‍के१०४ टक्‍के
बेंगळुरू१४,३६०८,०००१४,६१०८० टक्‍के-२ टक्‍के
चेन्‍नई३,७००४,६३०३,९३०-२० टक्‍के-६ टक्‍के
दिल्‍ली एनसीआर६,८१०४,२४०६,३४०६१ टक्‍के७ टक्‍के
हैदराबाद२०,४८०११,९६०२७,४३०७१ टक्‍के-२५ टक्‍के
कोलकाता३,८५०३,५००२,४१०१० टक्‍के६० टक्‍के
मुंबई३५,९२०३३,३३०२८,८८०८ टक्‍के२४ टक्‍के
पुणे२१,१९०२६,६१०१३,०३०-२० टक्‍के६३ टक्‍के
भारत१,२३,०८०१,१३,७७०१,०४,८२०८ टक्‍के१७ टक्‍के

स्रोत- रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३, हाऊसिंग रिसर्च

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content