Homeबॅक पेजजागतिक विद्यापीठ क्रीडा...

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी 4 तलवारबाजीपटूंना ‘साई’चा हात!

चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या आगामी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या एसएआयच्या नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स (NCOEs)च्या चार तलवारबाजीपटूंना भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आर्थिक मदत करणार आहे.

यामध्ये अभय कृष्णा शिंदे (NCOE पटियाला आणि टॉप्स खेळाडू), दुर्गेश मिलिंद जहागीरदार (NCOE औरंगाबाद आणि खेलो इंडिया खेळाडू) आणि NCOE पटियालाच्या खेळाडू तन्नू गुलिया आणि शिक्षा बल्लोरिया यांचा समावेश आहे.

तलवारबाजीच्या वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन (ACTC) योजनेंतर्गत हा कार्यक्रम समाविष्ट नसल्यामुळे, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनाची ज्यादा संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या खेळाडूंना विशेष बाब म्हणून हा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या स्पर्धेची 31वी आवृत्ती 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या इतर NCOE खेळाडूंमध्ये NCOE बेंगळुरूचा खेळाडू हरदीप (रेस वॉकिंग) आणि ख्याती (उंच उडी), NCOE त्रिवेंद्रमचे तायक्वांदो खेळाडू शिवांगी चनांबम आणि परसीदा नोंगमाइथेम तसेच NCOE इटानगर येथील वुशू खेळाडू सनमा ब्रह्मा यांच्यासह इतर अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content