Homeचिट चॅटऋषभ पंत आणि...

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा झाले ‘जॉली अँड पॉली’!

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना ‘जॉली’ आणि ‘पॉली’ या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे, जे लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील, याचीही काळजी घेतात. जीवन विम्याबद्दलची जागरूकता वाढत असतानाच एसबीआय लाइफ लोकांच्या दैनंदिन जीवनात हा विषय अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘अपने लिए, अपनो के लिए’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित, ‘जॉली आणि पॉली’ हे एक साधी पण महत्त्वाची बाजू मांडतात.

कंपनीचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभागाचे प्रमुख रवींद्र शर्मा म्हणाले की, महत्त्वाकांक्षांमध्ये भारत प्रत्येक पिढीमागे बदल अनुभवत आहे, जिथे व्यक्ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच, अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगू इच्छितात. आमचा विश्वास आहे की, जीवन विमा हा समतोल साधण्यास मदत करतो. ‘जॉली अँड पॉली’ ही संकल्पना हाच विश्वास सोप्या आणि सहज शब्दात मांडतात. हे दाखवून देतात की, जेव्हा लोक आपल्या जवळच्यांसाठी आर्थिकदृष्ट्या तयार असतात, तेव्हा ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. प्रियजनांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षेची खात्री असलेल्या व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. आमच्या ‘अपने लिए, अपनों के लिए’ हे तत्त्वज्ञान याच दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत तथा जॉली म्हणाला की, आपल्या देशातील तरुणांची स्वप्ने मोठी आहेत आणि त्या स्वप्नांना पंख देण्यासाठी संधी निर्माण करण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. खरंतर, व्यक्तींना भविष्य घडवण्यासाठी सक्षम करण्याच्या या ब्रँडच्या वचनबद्धतेशी मी मनापासून जोडला गेलो आहे. वास्तविक, स्वतःला जे आवडते, ते करावे, त्याचा पाठपुरावा करावा, या तत्त्वावर मी जगतो आणि जॉली म्हणून, मी कुटुंबांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करू देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर रवींद्र जडेजा तथा पॉली म्हणाला की, एसबीआय लाइफचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने मला देशभरातील कुटुंबांशी गप्पा मारण्याची आणि त्यांच्या घरातील संवादाचा एक भाग होण्याची एक अनोखी संधी मिळते. पॉली म्हणून, मी लोकांना विचारपूर्वक नियोजन करण्यास प्रोत्साहित करत आहे, जेणेकरून वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करताना त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी कसलीही तडजोड करावी लागणार नाही. व्यक्ती आणि कुटुंबांना हे पटवून देण्याच्या या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक ध्येय यांचा समतोल साधणे केवळ शक्य ठरवणारेच नाही, तर ते सबलीकरण करणारेदेखील आहे. मला आशा आहे की, आपण एक सांस्कृतिक बदल घडवून आणू आणि एक व्यक्ती – एक कुटूंब याप्रमाणे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करू शकू.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content