Homeबॅक पेजराजीनामा द्या आणि...

राजीनामा द्या आणि काय बोलायचे ते बोला!

मराठा आरक्षणाच्या विषयावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात विधानसभेत आज, मंगळवारी रात्री खडाजंगी झाली. मंत्रिमंडळातून राजीनामा द्या आणि मग काय बोलायचे ते बोला, असे चव्हाण यांनी भुजबळ यांना सुनावले. त्यावर मंत्र्याला हृदय नसते का, असे विचारत एका समाजाचे काही म्हणणे असते तेव्हा दुसऱ्या समाजाचेही काही म्हणणे असते, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

राज्य सरकार आरक्षणप्रश्नी मार्ग काढायची भाषा करत असताना एक मंत्री बाहेर काही विधान करतात आणि तेढ निर्माण करतात, हे योग्य आहे का, असा सवाल चव्हाण यांनी केला. मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान त्यांनी हा सवाल केला. तुम्ही समाजामध्ये भाषणे करून तेढ निर्माण करत असाल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून समजावून सांगावे. नाही तर समाजासमाजामध्ये भांडणे लावायची हा आपला राजकीय डाव असल्याचेच दिसेल, असेही चव्हाण म्हणाले.

राजीनामा

त्यावर भुजबळ यांनी उठून स्पष्ट केले की, अख्खे बीड पेटल्यानंतर, दोन आमदारांची घरे पेटल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तेथे जाऊन बघायचं. मी बघायला गेलो आणि पाहिल्यानंतर स्वतःला रोखू शकलो नाही. दोन महिने सतत ऐकत होतो आणि चूक ते चूक, हे सांगणे अयोग्य आहे का?

त्यावर चव्हाण म्हणाले की, मनोज जरांगे पाटील चुकीचे बोलत असतील तर मुख्यमंत्री कारवाई करू शकतात. मंत्रिमंडळाची शपथ घेता तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते. तुम्ही मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन काय करायचे ते करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था राखायला सक्षम आहेत आणि तेढ निर्माण करू नका, ही हात जोडून विनंती आहे.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content