Homeकल्चर +रिमेम्बरिंग पंचम आणि...

रिमेम्बरिंग पंचम आणि लिपोकमार त्झुदिरची मैफल ठरले कालचे आकर्षण

नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयरद्वारे आयोजित लिपोकमार त्झुदिर यांच्या संयोजनाखाली पाश्चात्य आणि लोकसंगीताची एक सुंदर मैफल झाली. दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली म्हणून राज सोढा, किशोर सोढा आणि सिद्धार्थ एंटरटेनर्स यांनी सादर केलेला कार्यक्रम काल आझाद मैदानावर सुरू असलेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा खास आकर्षण ठरला.

आपला देश विविधतेने नटलेला आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा देश म्हणून ओळखला जातो. या महान भूमीतील कला, हस्तकला आणि पाककृती या संपदेचा आस्वाद घेण्यासाठी उत्सव साजरा करण्याहून अधिक चांगला मार्ग आणखी कोणता आहे? आझाद मैदानावर सुरू असलेल्या  राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023च्या रूपाने ही अनोखी संधी मुंबईकरांना प्राप्त झाली आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 11 फेब्रुवारीला झाले. 19 फेब्रुवारीपर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात संपूर्ण भारतातील जवळजवळ 350 लोककला आणि आदिवासी कलाकार, जवळजवळ 300 स्थानिक लोककलाकार, काही ट्रान्सजेंडर कलाकार आणि दिव्यांग कलाकार, ख्यातनाम शास्त्रीय कलाप्रकारांचे सादरकर्ते, यांच्यासह प्रसिद्ध कलाकार आपल्या चित्ताकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

या कलाकारांव्यातिरिक्त, भारतातील सर्व राज्यांमधून आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधून सुमारे 150 कारागीरांना, ‘आंगन’ अंतर्गत त्यांच्या कला आणि हस्तकला प्रकारांची विक्री आणि प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले असून, यासाठी सुमारे 70 स्टॉल उपलब्ध केले आहेत. महाराष्ट्र राज्य हातमाग विभाग आणि स्टार्टअप्ससाठी 25 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मैदानावर फूड कोर्ट उभारली असून त्यामध्ये भारतभरातील खाद्यपदार्थांचे प्रकार, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच भरड धान्यांचे खाद्यपदार्थ सादर करणारे सुमारे 37 स्टॉल सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील. संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व नागरिक आणि कलाप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि आयकॉनिक बॉलीवूड संगीतासह, विविध परफॉर्मन्स रोज तुम्हाला संगीतमय जगाचा फेरफटका घडवून आणतील.

दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा–

पंचम

मग आपण कशाची वाट पाहत आहात? भेट द्या आणि आनंद लुटा…

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content