Homeटॉप स्टोरीकोविशिल्ड लस घेणाऱ्या...

कोविशिल्ड लस घेणाऱ्या आणखी काही लोकांना मिळणार सूट

पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल. या अनुषंगाने मुंबई महापालिका प्रशासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

विदेशात शैक्षणिक, नोकरी – व्यवसाय आणि ऑलिपिंक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कोविशिल्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस देण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. तसेच वैद्यकीय उपचार किंवा अपरिहार्य कारणांनी विदेशात जाणे आवश्यक असलेल्या व आपल्या प्रांतात परत जाण्यासाठी परदेश गमन करणे अनिवार्य असलेल्या नागरिकांनादेखील ही सवलत देण्यात आली होती. पर्यटन आणि इतर कारणांसाठी विदेशात जाण्यास इच्छुक नागरिकांकडूनदेखील कोविशिल्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ऐवजी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेण्याची मुभा मिळावी, ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. तसेच ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सुचनांनुसार शासकीय आणि खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. या आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनादेखील कोविशिल्डचा दुसरा डोस २८ दिवसानंतर मिळण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन मुंबई महापालिकेने कोविड लसीकरण संदर्भातील सुधारित अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल.

या सवलतीचा लाभ घेताना १८ वर्षे व अधिक वयोगटातील नागरिकांकडे वैध पारपत्र (Passport) असणे आवश्यक आहे. तसेच अशा नागरिकांना लस दिल्यानंतर लस प्रमाणपत्रात पारपत्राचा क्रमांक अंतर्भूत केला जाईल. पहिली मात्रा घेताना पारपत्र पुरावा म्हणून घेतला नसेल तरी संबंधित लसीकरण अधिकाऱ्यांनी त्याचा आग्रह न करता वेगळे लस प्रमाणपत्र देण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. शासकीय आणि खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.

लसीकरण केंद्रांवरील समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज भरुन घेतल्यानंतर तो प्रमाणित करुन कोविन प्रणालीवर अपलोड करतील. जागतिक आरोग्य संघटनेने कोविशिल्ड लस आपत्कालीन वापरासाठी मान्य केली आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्र कोविशिल्ड लशीचा उल्लेख हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे, असेही पालिकेने म्हटले आहे.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content