Homeटॉप स्टोरीसहारा ठेवीदारांचे 5000...

सहारा ठेवीदारांचे 5000 कोटी देण्यासाठी रिफंड पोर्टल!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा मंगळवारी नवी दिल्लीत ‘सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टल’ चा प्रारंभ करत आहेत. सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लि., हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि. या सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या खऱ्या ठेवीदारांना वैध दावे सादर करता यावेत यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

हे नमूद करणे योग्य ठरेल की सहारा समूहाच्या सहकार संस्थांच्या प्रामाणिक सभासद/ठेवीदारांच्या वैध ठेवींचे पैसे परत करण्यासंबंधीच्या त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहकार मंत्रालयाने देशातील सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सहारा समुहाच्या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांची उचित देणी परत करण्यासाठी 5000 कोटी रुपये “सहारा-सेबी रिफंड अकाउंट” मधून सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांना (सीआरसीएस) हस्तांतरित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने 29 मार्च 2023 रोजी आपल्या आदेशाद्वारे निर्देश दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार मंत्रालयाने त्याच्या स्थापनेपासून देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी आणि सहकारी संस्थांच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content