Homeकल्चर +माणिक वर्मा यांची...

माणिक वर्मा यांची ध्वनिमुद्रित मैफल १३ फेब्रुवारीला!

किराणा आणि आग्रा घराण्याच्या ख्यातनाम गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाची मैफल दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, १३ फेब्रुवारी २०२१ यादिवशी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.

त्यांना तबल्यावर नाना मुळे तसेच संवादिनीवर गोविंदराव पटवर्धन यांची साथ आहे. त्याची लिंक www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी उपलब्ध होईल. गानरसिकांनी विदुषी कै. माणिक वर्मा यांच्या सुश्राव्य ध्वनिमुद्रित गायनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.  

माणिक वर्मा यांनी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. सुरेशबाबू माने, उ. इनायत खाँ, उ. अजमत हुसेन खाँ आणिं नंतर आग्रा घराण्याचे गुणिदास पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून तालीम घेतली. पण घराण्याच्या पंरपरेबाहेर पडून स्वतःची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने कोरोना महामारी आणि टाळेबंदी यामुळे दरमहा प्रत्यक्ष होणारे कार्यक्रम सप्टेंबर २०२०पासून ध्वनिमुद्रण पद्धतीने श्रवणानंद देण्याचा स्वरसंचित हा उपक्रम सुरू केला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हा मान कै. माणिक वर्मा यांना आहे. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content