Homeडेली पल्ससरकार बदलले नसते...

सरकार बदलले नसते तर चीन, जपानचा ‘कोरोना’ येथे आला असता!

विदर्भ मराठवाड्यातील प्रश्नांच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्यात सरकार बदलले नसते तर पुन्हा एकदा चीन, जपानमधील कोरोना स्थितीचे कारण सांगून कदाचित विदर्भात नागपूरला विधानसभेचे अधिवेशन झाले नसते, असा टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी मारला. अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्याकडेही सिंचनाचे खाते होते. पण १५ वर्षांत फारसे सिंचन झाले नाही, असं मी म्हणत नाही तर पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी म्हटलं होतं, याकडे मुख्यमंत्री शिन्दे यांनी लक्ष वेधले.

सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी मांडलेल्या विविध तीन प्रस्तावांना एकत्रित उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विदर्भात अधिवेशन व्हावं, असं नानांना वाटायचं (पटोले) पण मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) दादांचे (अजित पवार) ऐकायचे, असा शेराही मुख्यमंत्र्यांनी मारला. नागपूरचे अधिवेशन हे हवापालटाचे किंवा मुंबईच्या कटकटीपासून दूर यासाठी नसते. विदर्भाला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे असते. पण हातून सत्ता गेली या धक्क्यातून विरोधी पक्ष काही सावरलेले दिसत नाहीत. चहापानावर बहिष्कार घालायची दादांची भूमिका नव्हती, पण तरी घालावा लागला. अजितदादांनाही वाटते की किमान बाहेरून तरी विरोधी पक्ष एक दिसायला हवेत. यासाठी त्यांना चहापानावर बहिष्कार घालावा लागला.

विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आणि विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही, असे सांगत विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाच्या विविध योजना जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी नाताळच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सांताक्लॉजसारख्या भेटी घोषणांतून दिल्या.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा विदर्भासाठी गेम चेंजर ठरला आहे. जमिनी दिल्या त्या सर्व शेतकऱ्यांना मी दोन दिवसांपूर्वी बोलावले होते आणि त्या सर्व शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गासाठी दिल्या. पण दिलेल्या जमिनीच्या दुप्पट क्षेत्राच्या जमिनी त्यांनी विकत घेतल्या आहेत. स्वतःची घरंही बांधली आहेत, असंही मुख्यमंत्री शिन्दे यांनी सांगितले.

कोरोना
ETNA3G

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास महामंडळांच्या स्थापनेसाठी आपण केंद्राला प्रस्ताव दिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर ते गोवा एक्सेस कंट्रोलही आपण करतोय आणि त्यातून मराठवाड्यातील समृद्धी महामार्गावर नसलेले जिल्हेही त्यात समाविष्ट होतील. नागपूर ते मराठवाडा आणि तेथून पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा आर्थिक कॉरिडॉरही आपण विकसित करत आहोत, असेही शिन्दे यांनी सांगितले. नागपूर हे शहर लॉजिस्टिक हब म्हणून उदयाला येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विदर्भ, मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या गुतंवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. विदर्भात ४४१२३ कोटी रुपयांची गुतंवणूक होत असून ४५ हजार लोकांना नोकऱ्या मिळतील. गडचिरोलीमध्ये २० हजार कोटींचा खनिज उत्खनन प्रकल्प केला असून सोनसळ येथे स्टील प्रकल्प सुरू होत आहे. तेथे रोजगार मिळेल आणि नक्षलवादही संपुष्टात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोसीखुर्दसह विविध सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही. सिंदखेडराजा आणि लोणार तलावासह विदर्भातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद केली जात आहे. समृद्धी महामार्ग जातोय अशा सर्व जिल्ह्यातून टूरिझम सर्किट निर्माण केले जाईल आणि त्याचा या भागाला मोठा फायदा होईल, असे मतही मुख्यमंत्री शिन्दे यांनी व्यक्त केले.

राज्यातील ७० टक्के खनिजसंपत्ती विदर्भात आहे. दोन नवे खनिज प्रकल्प आणि भंडाऱ्यातील स्टील प्रकल्प यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळू शकणार आहे. राज्याचे नवे खनिज धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सवलती, आर्थिक तरतुदीही जाहीर करण्यात आल्या. शेतकऱ्यांना आणखी आधार देण्याची गरज आहे. विदर्भाचा विकास हे आमच्या सरकारचे परमकर्तव्य आहे. पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवून आपण हे सर्व करू, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content